ताज्या घडामोडीसामाजिक

यात्रेतील तमाशा चालू देण्यावरुन सरपंचांची दबंगगिरी 


अकोले तालुक्यातील देवठाण येथे सरपंचाकडून आदर्श आचारसंहितेचा भंग.

 

यात्रेतील तमाशा चालू देण्या वरुन सरपंचांची दबंगगिरी 

 

अकोले:

सध्या लोकसभा पार्श्वभुमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागु करत, सर्वांना कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासह शांततेचे आवाहन प्रशासनाकडुन वारंवार करण्यात येत आहे. मात्र याला फाटा देण्याचे काम अकोले तालुक्यातील देवठाण गावात झाल्याचे बघावयास मिळाले, देवठाण गावात काशाई माता यात्रा उत्सव सरपंच निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांच्या अध्यक्षतेखाली विनापरवाना संपन्न होत असताना अध्यक्ष महोदय यांच्यासह काही ग्रामस्थांकडूनकडून गावातील जि.प शाळेच्या प्रांगणात संजय महाजन आनंदा लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

सध्या सन 2024ची लोकसभा सार्वत्रिक निवडणुकची आदर्श आचार संहिता चालू असुन मा. जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने जमाव बंदीचा आदेश लागु करण्यात आलेला आहे. सदर आदेशाचे विविध माध्यमांव्दारे सद्यस्थीतीत चालु असलेल्या सण उत्सवांमुळे जाहीरपणे त्याची प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. तसेच यात्रा उत्सवचे बाबतीत आचार संहितेचे अनुषंगाने सर्व गावांमध्ये पालन करायच्या नियमावली बाबत जाहीरपणे माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

Advertisement

 

दि. 14/04/2024ते दि.17/14/2024 रोजी मौजे देवठाण येथे सरपंच निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांचे अध्यक्षतेखाली काशाई मातेची यात्रा चालु असुन सदर यात्रा कार्यक्रमाचा पोलिस स्टेशन कडुन कुठलाही परवाना घेण्यात आला नव्हता अशी माहिती प्राप्त झाली आहे. व याबाबत यात्रेचे अध्यक्ष निवृत्ती विश्वनाथ जोरवर यांना तमाशा कार्यक्रमाची परवानगी घेणे बाबत सुचना देखील देण्यात आल्या होत्या मात्र याकडे कानाडोळा करत गावात यात्रे निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाणचे पटांगणात संजय महाजन आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला. सदर कार्यक्रम चालू असताना तेथे काही लोक गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण हांडोरे, पोहेकाँ वलवे, पोना घुले, पोकाँ बढे, पोकाँ गवारी, पोकाँ गोडगे असे सरकारी वाहनासह पेट्रोलिंग करत असताना सदर ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चालु असल्याने सदर ठिकाणी कार्यक्रमात काही लोक गोंधळ घालत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता सदर कार्यक्रम बंद करण्यासाठी पीए सिस्टीमव्दारे सुचना दिल्यानंतर तमाशा मंडळ यांनी सदर सांस्कृतिक कार्यक्रम बंद केला. मात्र त्यानंतर सदर ठिकाणाहुन लोक परत जात असताना 1) निवृत्ती विश्वनाथ जोरवर 2) अशोक बाबा शेळके 3) केशव अर्जुन बोडखे 4) पांडु सोनवणे 5) राम सहाणे 6) जालींदर बोडखे 7) रामहरी रखमा सहाणे 8) रमेश भाऊराव बोडखे 9) पांडु सोनवणे 10) रोहिदास सोनवणे 11) सौरभ सहाणे 12) बंटी सहाणे 13) आनंदा गि- हे14) मारुती वाकचौरे 15) प्रकाश नवले 16) काशिनाथ गि-हे 17) उमेश बाळासाहेब शेळके 18) संदिप ज्ञानेश्वर भांडकोळी 19) संजय भाऊराव शेळके 20) योगेश नामदेव सोनवणे 21) सुनिल घाडगे 22) शिवाजी वामन सोनवणे 23) सादिक मनियार 24) नारायण पुर्ण नाव माहित नाही रा. गि-हेवाडी व यात्रा कमिटीचे इतर सदस्य व इतर अनोळखी 25 ते 30 इसम सर्व रा.देवठाण ता. अकोले जि.अनगर यांनी सदर कार्यक्रम बंद का केला गावाच्या समोर पोलिस काही करु शकणार नाही त्यांच काही काम नाही असे म्हणत गोंधळ घालण्यात आला. 

वरील ग्रामस्था व इतर यात्रा कमिटीचे सदस्य व इतर अनोळखी 25 ते 30 इसम सर्व रा. देवठाण ता. अकोले जि. अनगर यांचे विरुध्द सरकारतर्फे भादवि कलम 141,143,188,186 सह महा. पोलिस अधिनियम कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे मी पो काँ सुहास शिवाजी गोरे यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *