ताज्या घडामोडीसामाजिक

मुलुंड सेवा संघ आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) येथे “२६ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा”


मुलुंड सेवा संघ आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) येथे “२६ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा”

मुंबई प्रतिनिधी

मुलुंड सेवा संघ आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) येथे “२६ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात विधान परिषद गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार मा.श्री प्रवीणजी दरेकर आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिषजी शेलार यांच्या शुभहस्ते १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.

Advertisement

याप्रसंगी आमदार मा.श्री प्रवीण दरेकरजी आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड आशिष जी शेलार यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी विवेक साप्ताहिक , मा.संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक श्री. रमेश जी पतंगे, समाजसेवक बिरजू मुंदडा, अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष मा.श्री.चेतन देडीया, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड, भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. अशोक राय, मुलुंड विधानसभा भाजपा अध्यक्ष मनीष तिवारी, भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ योजना ठोकळे, सिलिका फाउंडेशनचे संस्थापक सौ कविता रेडकर आणि मुलुंड सेवा संघाचे सचिव विनायक सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *