*दुधाच्या आंदोलनाला सर्वांनी गांभीर्याने घ्यावे- सतिश नेहे*
*दुधाच्या आंदोलनाला सर्वांनी गांभीर्याने घ्यावे- सतिश नेहे*
सिन्नर प्रतिनिधी
पूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी दुधाला हमी भाव मिळवा म्हणुन आंदोलन चालु आहे. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी आंदोलने चालु आहेत, त्याबद्दल राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी गांभिर्याने दखल घेऊन सरकार दरबारी आवाज उठविला पाहिजे. लाडक्या बहिणींनी कोणतेही आंदोलन न करता किंवा काहीही न मागता 1500 रुपये त्यांना जाहीर केले जातात. त्यावर किती बोलबाला चालु आहे. पण शेतकऱ्याच्या आंदोलनावर सारे काही आलबेल आहे. आपल्याला सरकार किती आणि काय काय फुकट देणार ? लोकांना कामाची सवय कायमच असायला हवी अशा फुकटच्या अनेक स्किम माणसाला आळशी बनवतील. शेतकरी हा रात्रंदिवस मेहनत करतो त्यामुळे तो हया अशा तुटपुंज्या सरकारी स्कीम वर मुळीच अवलंबून नाही. शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय द्या ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची आग्रहाची विनंती आहे . फुकटच्या स्कीम येणार ठराविक लोकच त्याचा पुरेपूर फायदा घेणार. सर्व सामान्यांना काहीच मिळणार नाही. ग्राउंड लेवल वर जाऊन कोणीही काम का करत नाही. शेतकरी का हमी भाव मागतो, ज्या उत्पादनाला शेतकरी हमी भाव मागतो त्याचा सर्व्हे करून सत्यता काय आहे हि पडताळून पाहण्याची गरज आहे. सर्व सामान्यांना काय पाहिजे हे कोणीही समजावून घेत नाही, असे का ? सरकारी अधिकारी यांना या सर्व बाबी माहीत असतात. पण ते कोणी समोर आणत नाही किंवा बोलत नाहित .सरकारने कोणतीही गोष्ट फुकट न देता त्या वस्तुवरील किंमत कमी करावी किवा त्यावर सबसिडी द्यावी . खासगी हॉस्पिटल , मेडिकल , शेतीचे खते व औषधे , पेट्रोल , डिझेल,गॅस व सर्वच अत्यावश्यक गोष्टी स्वस्त असायला पाहिजेत. त्यातूनच सर्व सामान्य माणसाचे जीवन जगणे सोप होईल.