आजी माजी खासदारांवर आंदोलनाची वेळ! जनतेच्या डोळ्यात धूळफेक की पदाचा रुतबा विसरले ? शिवसेना तालुका प्रमुख शरद शिंदे यांचा सवाल
आजी माजी खासदारांवर आंदोलनाची वेळ!
जनतेच्या डोळ्यात धूळफेक की पदाचा रुतबा विसरले ?
शिवसेना तालुका प्रमुख शरद शिंदे यांचा सवाल
सिन्नर प्रतिनिधी
कायदे मंडळाचे सदस्य म्हणून लोकप्रतिनिधींना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. कार्य पालिकेवर या लोकप्रतिनिधींचा म्हणूनच वचक असतो.असायला हवा.तथापि अलीकडच्या काळात हे लोकप्रतिनिधी जन सामान्यांचे प्रशासनाशी निगडित असलेल्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी या विशेष अधिकारांचा वापर करून प्रशासनावर प्रभाव दाखवण्याऐवजी विविध प्रश्नांसाठी जनतेला आंदोलन करण्यास भाग पाडून त्यात स्वतःला मिरवून घेण्याची प्रथा फोफावली आहे.ही बाब निदर्शनास आणून देत ही मंडळी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत की,स्वतःच्या पदाचा रुतबा विसरले असा सवाल सिन्नर तालुक्याचे शिवसेना प्रमूख शरद शिंदे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नाशिकच्या आजी माजी खासदारांनी आंदोलन करावे,निवेदन द्यावे हे हास्यास्पद असल्याचे सांगून शरद शिंदे म्हणतात की,खासदार पद हे एखाद्या अधिकाऱ्याच्या पदापेक्षा मोठे आहे.वीज वितरण अधिकारी असोत नाही अन्य कुणीही. माजी खासदाराप्रमाणे विद्यमान खासदार देखील निवेदन देतात.खासदारांनी निवेदन द्यायचे नसते तर अधिकाऱ्यांना आदेश वजा सूचना द्यायच्या असतात.माझी खासदारांनी देखील गेली दहा वर्ष हेच केले.मग त्यांना निवडून देण्यात काय हशील? हे खासदार आणि सामान्य तालुका प्रमुख शरद शिंदे यांच्यात काय फरक ?असेही ते विचारतात.अधिकारी ऐकत नसतील तर संसदेत प्रश्न उपस्थित करून मुद्दा निकाली काढा.असा अनाहुत सल्ला शरद शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना दिला आहे.