आदिवासी शेतकऱ्याचे आर्थिक शोषण: कथित पत्रकाराचा दिड लाखांचा गंडा; अभोणा पोलिसात गुन्हा दाखल
आदिवासी शेतकऱ्याचे आर्थिक शोषण: कथित पत्रकाराचा दिड लाखांचा गंडा; अभोणा पोलिसात गुन्हा दाखल
नाशिक प्रतिनिधी
वडीलोपार्जीत शेतजमीन नावावर करुन देण्याचे अमिष दाखवुन त्या मोबदल्यात वेळोवेळी टप्या टप्याने 1 लाख 50 हजार रुपये घेऊन ठकबाजी केल्याच्या तक्रारीवरून कथित पत्रकार संदिप भिकाजी अवधुत याचे विरोधात अभोणा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. कळवण तालुक्यातील सुकापुर येथील सुभाष सोमा बागुल यांची वडीलोपार्जीत शेतजमीन सुकापुर येथे आहे,ती जमीन वडील सोमा बागुल यांचे नावावर करण्यासाठी त्यांची प्रशासकीय प्रक्रीया सुरु असताना त्यांची परीचीत महिला यांनी संदिप भिकाजी अवधुत हे जमीन नावावर करुन देतील त्यांची तहसील कार्यालयातील अधिकारी यांचेबरोबर ओळख आहे व ते पत्रकार आहेत असे सांगितले . त्यानंतर संदिप अवधुत हा त्या महिलेच्या घरी आॕगस्ट 2020च्या पहिल्या आठवड्यात
आला त्यावेळी सोमा झांब्रु बागुल , भागीबाई सोमा बागुल व सुभाष सोमा बागुल हे आदिवासी शेतकरी कुटुंबिय तेथे गेले.जमीनीचे मुळ कागदपत्र घेऊन गेलो .तेव्हा संदिप अवधुत याने सांगितले की माझी तहसील कार्यालयातील अधिकारी यांचेशी चांगली ओळख आहे.तुमची वडीलोपार्जीत जमीन नावावर करण्याची हमी घेऊन त्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये खर्च येईल असे सांगितले .तसेच पहिला हप्ता म्हणुन 25 हजार रुपये जमा करण्यास सांगितले .त्याचे सांगण्यावरुन त्यावर विश्वास ठेऊन 25 हजार रुपये त्या महिलेच्या घरी संदिप अवधुत यास दिले.व त्यासोबत जमीनीचे मुळ कागदपत्र दिले.त्यानंतर आॕक्टोबर 2020 या महीन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संदिप अवधुत यांनी सुभाष बागुल याना फोन करुन सांगितले की,पुढील आठवड्यात तुमच्या जमीनीचे कागदपत्रे तयार करण्यासाठी पुणे येथे जायचे आहे त्यासाठी 50 हजार रूपये लागतील.एका आठवड्यात पैसे ऊसनवारीने नातेवाईकांकडुन घेऊन खिराड फाटा ,खिराड ,ता.कळवण या ठिकाणी संदिप अवधुतला व सुभाष बागुल व सोमा बागुल यांनी दिले व पुणे येथुन जाऊन आलो की तुमची जमिन तुमच्या नावावर होणार आहे असेआश्वासन दिले.,काही दिवसानंतर अवधुत याचेशी फोनवरुन संपर्क साधुन जमीन नावावर झाली काय असे विचारले असता साहेबांची बदली झाली आहे नविन साहेब येणार आहेत त्यामुळे अजुन पैसे लागतील त्यामुळे तुम्ही तयारीत राहाअसे सांगितले .त्यानंतर जानेवारी 2021 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या मध्यस्ती महिलेच्या घरी संदिप अवधुत पुन्हा आला व जमीन नावावर करण्यासाठी अजुन 25 हजार रुपयांची मागणी केली,मार्च 2021 या महीन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संदिप अवधुत हा वडपाडा येथे आला व सुभाष बागुल यांच्या कुटुंबियांच्या इतर शेतजमीनीचा वाद असल्याने सर्वच शेतजमीनी नावावर करुन देण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली.व त्याला 50 हजार रुपये रोख स्वरुपात दिले.सुभाष बागुल हे उदरनिर्वाहासाठी कसत असलेली जमीन नावावर करुन देण्याचे अमिष संदिप अवधुतषयाने दाखवुन आॕगस्ट 2020 ते मार्च 2021 पर्यंत टप्याटप्याने 1 लाख 50 हजार रुपये घेतले. सन 2023 पर्यंत संदिप अवधुत याने जमिन नावावर करुन दिली नाही शेवटी वैतागुन 1 लाख 50 हजार रुपये व जमीनीचे मुळ कागदपत्रे परत करण्यासाठी सांगितले असता फक्त आश्वासन दिले,दिड वर्षापासुन फोनवर संपर्क केला तरी प्रतिसाद देत नाहीत.जुन 2024 मधे माझे जमीनीचे मुळ कागदपत्रे मध्यस्थी महीलेकडे दिले ते परत मिळाले मात्र 1 लाख 50 हजार रुपये अद्यापपावेतो संदिप अवधुत याने परत केले नाही कळवण व सुरगाणा परीसरातील काही इसमांकडुनही जमीन नावावर करुन देण्याच्या बहाण्याने त्यांचेकडुन संदिप अवधुत याने पैसे उकळल्याचे प्रसार माध्यमातुन समजले त्यामुळे फसवणुक झाल्याची खात्री झाली असुन आॕगस्ट 2020 ते मार्च 2021 या दरम्यान अज्ञानपणाचा फायदा घेऊन कसत असलेली वडीलोपार्जीत शेतजमीन नावावर करुन देण्याचे अमिष दाखवुन वेळोवेळी 1 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणुक केल्याच्या फिर्यादीतील उल्लेखावरुन तोतया पत्रकार संदिप भिकाजी अवधुत याचे विरोधात ठकबाजीचा गुन्हा अभोणा पोलिसांनी दाखल केला आहे.
“तोतया व्यक्तीने अजून काही जणांची आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.”
– यशवंतराव शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अभोणा
–