*नवरात्रोत्सवातील पाचव्या माळेला महालक्ष्मी देवी त्रंबोली (टेंबलाई) देवीच्या भेटीला – भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग*
*नवरात्रोत्सवातील पाचव्या माळेला महालक्ष्मी देवी त्रंबोली (टेंबलाई) देवीच्या भेटीला – भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग*
नाशिक प्रतिनिधी
नवरात्रोत्सवात विविध धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व असते. त्यातीलच एक ऐतिहासिक परंपरा म्हणजे महालक्ष्मी देवीने आपल्या मोठ्या बहिणी त्रंबोली (टेंबलाई) देवीला भेट देण्याची. ही परंपरा यंदाही नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळली गेली.
आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हासुरू नावाचा राक्षसाचा वध टेंबलाई देवीने केला. विजय मिळाल्यानंतर महालक्ष्मी देवीने उत्सव साजरा केला परंतु टेंबलाई देवीला आमंत्रण द्यायचे विसरली. त्यामुळे रुसून टेंबलाई देवी डोंगरावर गेली. त्यानंतर महालक्ष्मी देवी दरवर्षी आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी तिच्या दर्शनाला जाते. त्याच स्मरणार्थ नवरात्रीच्या पाचव्या माळेला ही परंपरा आजही अखंड सुरू आहे.
गेल्या अकरा वर्षांपासून हा सोहळा रंगत असून यावर्षीही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बागूल कुटुंबीयांनी १२५ वर्ष जुन्या श्री टेंबलाई माता मंदिरास भेट दिली. पालखीत बसून, ढोल-ताशांच्या गजरात महालक्ष्मी देवी मंदिरात आणण्यात आली. आरती करण्यात आली आणि कोहळा कापून देवीच्या उत्सवाचा सन्मान करण्यात आला. भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचा मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
या धार्मिक सोहळ्यात टेंबलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरी, महामंडलेश्वर शुभलक्ष्मी, शुभांगी जगवाले, मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य सौ छायाबाई बावरी, मंगला पवार, प्रसाद बावरी, भूषण सदभैया, विजय पवार, सौ प्रियंका अहिरराव, राहुल वैद्य, सुभाष जाधव, अनिल जाधव, महादू बेडकुळे, सौ तनुजा बावरी, बाळू मोरे, गौरव साळवे, तुषार पगारे, दीपक काळे, यश साळवे, श्री ताई कोदे सह आदी उपस्थित होते. तसेच शेकडो भाविकांनी मंदिर परिसरात हजेरी लावून नवरात्रोत्सवाची परंपरा अधिक उज्ज्वल केली.