मोबाईल लॅपटॉप चोरी प्रकरणातील खरे हिरो : नाशिक गुन्हे शाखेच्या जवानांची शौर्यगाथा
मोबाईल लॅपटॉप चोरी प्रकरणातील खरे हिरो : नाशिक गुन्हे शाखेच्या जवानांची शौर्यगाथा
नाशिक प्रतिनिधी
मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला गजाआड करून तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करणं ही नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी ठरली आहे. मात्र, या तपासामागे काही पोलिस जवानांचे अहोरात्र प्रयत्न आणि चिकाटी महत्त्वाची ठरली.
पोहवा माझीमखान पठाण, संदिप भांड, विशाल काठे आणि पोअं अमोल कोष्टी यांनी संशयित आरोपींचा माग काढण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले. गुप्त माहितीदारांशी संपर्क साधून त्यांनी आरोपींच्या हालचालींचा सुगावा मिळवला. अखेर आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेले आरोपी सापळा रचून पकडले गेले. या धाडसी कारवाईत या जवानांनी मोठं योगदान दिलं.
Advertisement
त्यांच्या शौर्यामुळे आणि तपासातील दक्षतेमुळे चोरी गेलेले ५३ मोबाईल आणि ६ लॅपटॉप असे एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जवानांच्या कार्याचे विशेष कौतुक केले असून, नाशिककरांसाठी हे पोलीस खरे हिरो ठरले आहेत.
मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल ५३ मोबाईल आणि ६ लॅपटॉप असा ३५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासातून ही कारवाई उघडकीस आली आहे शाखा युनिट-१ च्या पथकाने चितूर, आंध्रप्रदेश येथे सापळा रचून दोन आरोपींना अटक केली.
रामु बालराज आणि सत्यवेल श्रीनिवासु अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्या चौकशीतून आणखी एक साथीदार नागे आनंद नित्यानंद आणि एक विधी संघर्षित बालक यांचा सहभाग उघड झाला आहे.
आरोपींकडून तब्बल ५३ मोबाईल आणि ६ लॅपटॉप असा ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विशेष म्हणजे या टोळीमुळे सातपूर, सरकारवाडा, पंचवटी अशा विविध पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.