अरे संसार संसार जसा तंबू डोक्यावर; रस्त्यावर संसार मांडताना!हातावर कमवायचे आणि पानावर खायचे!!
अरे संसार संसार जसा तंबू डोक्यावर;
रस्त्यावर संसार मांडताना!हातावर कमवायचे आणि पानावर खायचे!!
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
बाळासाहेब भालेराव मुरबाड
संसार म्हटला की भांडीकुंडी घरदार कपाट पलंग आणि आताच्या जमान्यात तर लाखो करोडच संपत्ती म्हणजे संसार परंतु अरे संसार संसार जसा तवा चुलीवरआधी हाताला चटके मग मिळते भाकर बहिणाबाईंच्या गाण्याप्रमाणे संसाराची व्याख्या त्यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे.
आधुनिक काळातला माणूस आणि आताच्या कलियुगातला माणूस याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. घर नाही, दार नाही, वर्षाचे बारावी महिने डोक्यावर संसार घेऊन फिरणारी अनेक कुटुंबे आहेत अशाच प्रकारे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात टोकावडे करचोंडे फाट्याजवळ सह्याद्री पर्वतीच्या समोर अशाच प्रकारची राहूटी (तंबू)टाकून त्या कुटुंबाने आपला संसार मांडला आहे कोणत्याही प्रकारचा लवाजमा नाही. हातावर कमवायचे आणि पानावर खायचे अशा प्रकारचे या माणसांचे जीवन आहे माणूस प्रगती करतोय लाखो करोडची संपत्ती कमवणारे आणि आलिशान घरांमध्ये राहणारे लोक आणि अशा तंबूमध्ये वर्षाचे बारा महिने आपला संसार डोक्यावर घेऊन फिरणारे अनेक कुटुंबे आहेत शासनाने सुद्धा अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा अशी मागणी यातून पुढे येऊ लागली आहे सदर कुटुंबांचा सर्वे करून गाव तालुका जिल्हा याची माहिती घेऊन स्थानिक भूमिपुत्र असलेल्या या लोकांचे पुनर्वसन करणे व त्यांना रोजगार देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे स्थानिक तहसीलदार, जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, अशा प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन अशा लोकांना न्याय द्यायला हवा असे जाणकार नागरिकांनी माहिती देताना सांगितले.