नोकरीच्या अमिषाने मालेगावच्या सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यावधीची फसवणूक; नामको बँकेत चालू खाते उघडून तरुणांची दिशाभूल
नोकरीच्या अमिषाने मालेगावच्या सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यावधीची फसवणूक;
नामको बँकेत चालू खाते उघडून तरुणांची दिशाभूल
मालेगाव प्रतिनिधी
मालेगांव शहरातील सिराज अहमद नामक एका इसमाने मालेगांव तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगांव येथे नोकरी लावण्याचे आमीष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसैनिक प्रमोद पाटील यांनी केला आहे.
या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत…. यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, या इसमाने १२ मुलांच्या नावाने कंपनी उघडून त्यांचे नाशिक मर्चेट को-ऑपरेटीव्ह बँक, शाखा मालेगांव येथे सेव्हींग खात्याच्या नावाने करेंट खाते उघडले.करंट खात्याचे चेकबुक व पासबुक हे सिराज नामक इसमाने खातेदारांच्या हातात न देता बँकेकडून पासबुक व चेकबुक परस्पर स्वतःकडे घेतले.हा घडलेला आर्थिक व्यवहार कंपनीच्या उघडलेल्या खातेदारांना कळू नये याची पुरेपुर काळजी घेतली व या १२ तरुणांकडून त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन सर्वांचे नविन सिमकार्ड काढले व नविन मिळालेला मोबाईल नंबर सिराजने स्वतःकडेच ठेवले, जेणेकरुन बँकेत पैसे जमा झाल्याचे व काढल्याचे मेसेज व ओटीपी स्वतःच ऑपरेट केले.
आपल्या अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे कळताच या सर्व मुलांनी बँकेत धाव घेतली. विचारपुस करुन आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट घेतले. ते बघून सर्व मुलांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
एक – एक मुलाच्या खात्यावर १५-२० दिवसांतच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळुन आले. त्याबाबतचे बँकेचे स्टेटमेंट आमचेकडे आहे.त्याच क्षणी या सर्व मुलांनी बँकेत लेखी अर्ज देऊन आमचे आर्थिक व्यवहार होल्ड करणेबाबतचे पत्र बँकेला दिले व आज रोजी खाते होल्ड आहे.
वरील सर्व घटनाक्रम बघता आदर्श आचार संहितेच्या काळात शेकडो कोटीचा आर्थिक व्यवहार १५-२० दिवसांत होणे हे देखील संशयास्पद आहे. हा पैसा आला कुठून न आणि कुठे गेला याची सखोल चौकशी होऊन फौजदार कारवाई होऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत आज शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
संशयित खाते :
१) ०२३१००१०००००१८७
रेड रोझ ट्रेडींग कंपनी
२) ०२३१००१०००००१९०
चॉईस मार्केटींग
०२३१००१०००००१९१
मेघा ट्रेडर्स
०२३१००१०००००१९७
सनराईझ ट्रेडर्स
०२३१००१०००००१९९
ब्लु स्काय ट्रेडींग
०२३१००१०००००२००
ग्लोबल इन्टरप्रायजेस
०२३१००१०००००२०२
एपेक्स ट्रेडर्स
०२३१००१०००००२०३
पार्क व्हिव ट्रेडिंग
०२३१००१०००००२०६
कोमल एजन्सी
१०) ०२३१००१०००००२०१०
सागर ट्रेडींग
११) ०२३१००१०००००२११
स्वतीक ट्रेडर्स
यांची फसवणूक झाल्याचा संशय :-
राणेश लोटन मिसाळ
प्रतिक पोपट जाधव
मनौज गौरख मिसाळ
जयेश लोटन मिसाळ
राहुल गोविंद काळे
राजेंद्र नंदकुमार बिंद
धनराज देविदास बच्छाव
ललीत मानाजी मोरे
पवन पोपट जाधव
दिवाकर कैलास घुमरे
दत्तात्रेय कैलास उशीरे