क्राईम

गुटख्या अड्यावर पोलिसांनी मारला छापा; निरंक अहवालाने कारवाईच्या नुसत्या गप्पा ; संशयाला वाव, तोतया कसा बनला साव 


गुटख्या अड्यावर पोलिसांनी मारला छापा;

निरंक अहवालाने कारवाईच्या नुसत्या गप्पा ;

 

संशयाला वाव, तोतया कसा बनला साव 

 

 

 

नाशिक प्रतिनिधी

 

 

सेनापती प्रामाणिक असला तरी मोहीमेवर जाणारे सैन्य फंदफितूरीत अडकले तर प्रांत गमावण्याची वेळ येते. नाशिक ग्रामिण पोलीस सध्या याच चक्रव्युहात अडकले आहेत, पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासारखे ग्रामिण पोलीस दलातील काही म्होरके पोलीस अधिकारी म्हणजेच आपापल्या दलाचे सेनापती कर्तव्याशी प्रामाणिक असले,तरी त्यांच्या बटालीयन मधील काही सैनिक गद्दार निघाल्याचे समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन व असामाजीक अपप्रवृत्तीवर कारवाईस अग्रक्रम देण्याच्या वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करताना, खबरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, अवैध गुटख्याचा साठा असलेल्या शेडवर वणी पोलिसातील काही मंडळींनी धाड टाकली. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सोपस्कार पार पाडले गेले आणि घटनास्थळी काहीच आढळुन आले नसल्याचा दावा करून निरंक असा तोंडी अहवाल चर्चेत आणला.खरं तर प्रत्यक्ष कारवाई दरम्यान घटना स्थळावर काय घडले याचा इतिवृत्तांत तो गुटखा माफिया, खबरी, आणि धाड पथकातील वणी पोलिस आणि या चमूतील प्रत्यक्ष दर्शी आमचे सूत्र यांनाच माहित आहे. मात्र धाड पथकातील वणी पोलिसांनी पसरवलेल्या “निरंक” वृत्तांताने पुन्हा एकदा सेनापतींची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

Advertisement

वणी पिंपळगाव रस्त्यावरील एका काॕलनीतील शेवटच्या टोकाला बांधकाम सुरु असलेल्या रो हाऊसच्या समोर पत्र्याचे शेड असुन त्या ठिकाणी गुटख्याचा साठा असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या

माहितीची खातरजमा करूनच पोलिस कुठल्याही मोहिमेवर जातात, त्याप्रमाणे यावेळीही खातरजमा करूनच पथक मोहिमेवर गेले. खबरी पक्का असल्याने आत्मविश्वास वाढलेल्या पथकाने कारवाई फत्ते केली. मात्र माघारी फिरतांना सारे काही निरंक.धाडस्थळी काही आक्षेपार्ह आढळुन आले नसल्याची माहीती दिली. हे ठिकाण तसे चर्चेतले.या ठिकाणी रात्री उशिरा अनेक वाहनांची वर्दळ असते.तोतायागीरी करणारा एका पत्रकाराच्या दिवसा आणि रात्री अनेक फेऱ्या या ठिकाणी होतात, त्या कशासाठी? असे सवाल स्थानिक रहिवाशी विचारताना दिसतात.धाड स्थळावरील एक व्यक्ती आणि हा तोतया यांच्यातील मैत्रीचे धागे परिसरात सर्व परिचित आहेत. मग पोलिस यंत्रणा अनभिज्ञ कशी? दाखवले जात असलेले स्वच्छ चारित्र्य आणि त्याचा व्यवसाय यातील विरोधाभास सर्व शहराला ज्ञात असताना कायद्याचे रक्षक अज्ञानी आहेत का? त्याचे उत्तर त्याचे खाकीशी असलेल्या मधुर संबधांच्या गुलदस्त्यात दडले आहे,खबरेगीरी आणि त्यानंतरचे सोपस्कार अशी दुहेरी भूमिका बजावणारा हा महाभाग कुणाच्या आशीर्वादाने कुणा कुणाचे उखळ पांढरे करतो हे उघड गुपित आहे.

म्हणूनच धाड टाकलेल्या ठिकाणी गुटखा सापडला किंवा नाही हा संशोधनाचा वा चौकशीचा विषय होऊ शकतो. सोबत खरोखमा यात दोषी कोण? धाड पथकाचीही खबर काढून पोहचविणारा आणखी कुणी घरभेदी आहे का? याचेही उत्तर शोधणे क्रमप्राप्त आहे. आधिकारी व पथक यांना हात हलवित परत यावे लागले तो पर्यंत मालाची विल्हेवाट लावण्यासाठीची वेळ तोतयाला देण्यात आली होती का याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून खुलेआम उजळ माथ्याने खाकीबरोबर वावरणाऱ्या तथाकथित तोतया तस्कराला अभय कोणाचे याचे उत्तर वरीष्ठांनी शोधण्याची वेळ आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *