नाशिक पूर्व मध्ये तुतारीचा निनाद घुमला ; ढोल ताशांच्या तालात प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
नाशिक पूर्व मध्ये तुतारीचा निनाद घुमला ;
ढोल ताशांच्या तालात प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
नाशिक प्रतिनिधी
पूर्व नाशिक विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतर्फे मतदारांचा कौल मागण्यासाठी मैदानात उतरलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश गीते यांच्या पंचवटी विभागीय प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेत्यांसह सर्व समाजातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी झाला.
पंचवटी कारंजा स्थित संपन्न झालेल्या या कार्यालय शुभारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे हा राजकीय नव्हे तर एखादा सामाजिक सोहळा भासावा अशा वैविध्यतेच्या छटा यावेळी उपस्थितांची नजर खिळवून ठेवत होत्या. हे निवडणुकीत सहभागी झालेल्या एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या प्रचाराचे कार्यालय आहे, अशी पुसटशीही शंका नागरिकांच्या उपस्थितीवरून येणार नाही, सर्व जात धर्माचे नागरिक प्रातिनिधीक स्वरूपात शुभारंभ सोहळ्याला उपस्थिती लावून तर गेलेच, याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत अन्य राजकीय पक्षांचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती हवेची दिशा निर्देशीत करून गेली अशी चर्चा रस्त्याने जाणारे येणारे तटस्थ पणे करतांना दिसत होते.पंचवटी आणि एकूणच शहरातील राजकीय दृष्ट्या अडगळीत पाडलेले जुने जाणते सर्व पक्षीय पाडलेले,त्यानंतरच्या पिढीतील चेहऱ्यांसह नव चैतन्याचे स्फूलिंग चेतवणारे तारुण्यातील कार्यकर्त्यांची फळी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करून गेले.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील पंचवटी प्रचार कार्यालयाचे उदघाटन सोहळ्याला नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, धुळे जिल्ह्याचे खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, भगवान भोगे, शरद आहेर, उल्हास सातभाई, तानाजी जायभावे, डॉ.दिनेश बच्छाव, लक्ष्मण मंडले, विजय राऊत, संदीप शर्मा, लक्ष्मण धोत्रे, दिगंबर गीते, अनिल कोठुले, सतनाम राजपूत, किरण पानकर, रावसाहेब कोशिरे, महेंद्र आव्हाड, संतोष जगताप, विलास आहेर, विलास धात्रक, संजय कातकडे, सुनील निर्गुडे, महेंद्र बडवे, सचिन भुजबळ, उद्धव पवार, अजय बोधले, राहुल खोडे, संजय कातकडे, विलास आहेर, आशाताई मोरे, सुषमा ठेंगे, सविता काळे, कोमल पाटील, माधवी साळवे आदींसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.