दिवाळी भेटीसाठी एसटी प्रशासन निवडणूक आयोगाकडे पाठवणार प्रस्ताव; एस टी संघटना आक्रमक; एसटी प्रशासन आणि मान्यताप्राप्त संघटनेची बैठक
दिवाळी भेटीसाठी एसटी प्रशासन निवडणूक आयोगाकडे पाठवणार प्रस्ताव;
एस टी संघटना आक्रमक; एसटी प्रशासन आणि मान्यताप्राप्त संघटनेची बैठक
मुंबई प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दरवर्षी देण्यात येते. या वर्षी मात्र महामंडळाच्या निधी मागणीच्या प्रस्तावावर सरकारकडून कुठलाच निर्णय अद्याप न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.एसटी महामंडळाकडून निवडणूक आयोगाकडे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेट पूर्ततेबाबत ८ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठवणार असल्याचे समजते.
सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना एसटी कर्मचारी मात्र तुटपुंज्या रकमेत यंदाची दिवाळी साजरी करत आहेत. गेल्या वर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना 6,००० इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. या वर्षी महामंडळाने कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६,००० रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचार संहिता लागू झाली.
एसटी प्रशासनासोबत मान्यताप्राप्त संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनेने आक्रमक भूमिका घेत जर दिवाळी भेटीची मागणी आम्ही आचारसंहितेपूर्वी केलेली असताना आणि बोर्डाच्या बैठकीतही ती मागणी मंजूर झाली.
१५ ऑक्टोबर रोजी ५२ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावासंदर्भात महामंडळाने सरकारकडे निधी मिळावा, यासाठी वारंवार विचारणा केली. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटी बाबत कोणताच निर्णय झाला नाही.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष
असतानाही एसटी कामगारांना ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक लाभापासून वंचित ठेवल्याने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे दिवाळी भेट आणि उचल तातडीने मिळावी, अशी आग्रही मागणी संघटनानी यावेळी केली.
अध्यापही बोनस, सानुग्रह अनुदान याबाबत निर्णय झाला नसल्याने राज्यभरात एसटी कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून निवडणूक आयोगाकडे कर्मचाऱ्यांची आचार संहितेमुळे अडकलेली दिवाळी भेट मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
■ “व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवजी कुसेकर व महामंडळाचे वित्तीय सल्लागार गिरीशजी देशमुख यांनी दिवाळी भेट देण्याचे मान्य केले. मात्र, आचारसंहितेची अडचण येऊ नये, म्हणून निवडणूक आयोगाच्या मंजुरी अंती कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीची रक्कम अदा करण्याचे त्यांनी सांगितले.”
-संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना
……………..
‘आम्ही याबाबत सकारात्मक आहोत. प्राथमिक चर्चा सुरू आहे. शक्य झाल्यास याबाबत प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत.”
– गिरीश देशमुख, वित्तीय सल्लागार, एसटी महामंडळ