ग्रीन चिलीच्या व्यवसायात मित्राकडून साडेसात लाखांची फसवणूक; अंबड पोलिसांत गुन्हा दाखल
ग्रीन चिलीच्या व्यवसायात मित्राकडून साडेसात लाखांची फसवणूक;
अंबड पोलिसांत गुन्हा दाखल
सिडको:-प्रतिनिधी
ग्रीन चिलीच्या व्यापाराकरिता दिलेल्या साडेसात लाख रुपयांचा मित्राने अपहार करून एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार कामटवाडा येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पंकज किशोर बोरसे (रा. विठ्ठलनगर, कामटवाडा, नाशिक) व आरोपी प्रीतेश केदार (रा. नाशिक) हे दोघे एकमेकांचे ओळखीचे मित्र आहेत. फिर्यादी बोरसे याने प्रीतेश केदार याला ग्रीन चिलीच्या व्यापाराकरिता पार्टनरशिप म्हणून जानेवारी २०२४ ते ९ मार्च २०२४ या कालावधीपर्यंत प्रीतेश केदार याच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर ७ लाख ६६ हजार रुपये पाठविले. आरोपी केदार याने या रकमेचा अपहार करून फिर्यादी बोरसे यांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात प्रीतेश केदार याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.