संत कबीर नगरच्या खूनी टोळीच्या ४८ तासात बांधल्या मुसक्या; गंगापुर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक तसेच गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी
संत कबीर नगरच्या खूनी टोळीच्या ४८ तासात बांधल्या मुसक्या;
गंगापुर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक तसेच गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी
नाशिक प्रतिनिधी
संत कबीरनगर परिसरात झालेल्या खुनाचा संयुक्त तपास करतांना गंगापूर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दोन विधी संघर्षित बालकांसह सहा संशयित मारेकऱ्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. शहरातील गुन्हेगारी टोळ्या अल्पवयीन मुलांचा अजूनही गुन्हा करण्यासाठी वापर करीत असल्याचे या प्रकारातून पुन्हा एकदा निष्पन्न झाले.
या संदर्भात पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती अशी की
दिनाक ०८/०३/२०२५ रोजी रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान संतकबीरनगर, भोसला स्कुलच्यामागे, नुतन वाघ यांचे दुकाना समोरच्या रोडवर अरुण रामलु बंडी, वय १७ वर्षे, याची मोटारसायकल अडवुन त्यास समीर सैय्यद, विलास थाटे, जावेद, करण चौरे, ओम खंडागळे, व त्यांचे इतर साथीदारांनी जुन्या वादाची कुरापत काढून त कोयता, बेसबॉलचा दांडा, रॉड, लोखंडी शिकंजा व दगडांनी मारहाण करुन जिवे ठार मारल्याची फिर्याद जयकिशोर पंडित यांनी दिनांक ०९/०३/२०२५ रोजी गंगापुर पोलीस ठाण्यात दिली होती.
गंगापुर पोलीस ठाण्यात गुरनं. ५९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) (२),१८९(२), १९०,१९१ (१) (२) (३) १२६ (२) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने संयुक्तपणे करून अवघ्या ४८ तासात संशयितांना बेड्या ठोकल्या. दाखल करण्यात आला होता.
गंगापुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाचे पोउनि मोतीलाल पाटील व गुन्हेशोध पथकाने सदर गुन्हयात फरार असलेले ५ आरोपी व गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ यांनी १ विधी संघर्षित बालक यास विंचुर नाशिक ग्रामिण येथुन ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा ४८ तासांच्या आत उघडकीस आणला.सदर गुन्हयात समीर मुनीर सैय्यद, वय २९ वर्षे, रा. संतकबीरनगर, नाशिक जावेद सलीम सैय्यद, वय ३२ वर्षे, रा. संतकबीरनगर, नाशिक ३) विलास संतोष थाटे, क्य १८ वर्षे, रा. संतकबीरनगर, नाशिक ४) करण उमेश चौरे, वय १९ वर्षे, रा. संतकबीरनगर, नाशिक यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयातील ०२ विधी संघर्षित बालक यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ एकचे पो. उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सरकारवाडा विभागाचे सहा. पो. आयुक्त नितीन जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, सपोनि निखील पवार, सपोनि हर्षल अहिरराव, गुन्हे शोध पथकाचे पोउनि मोतीलाल पाटील, परि. पोउनि शरद पाटील, पोहवा गिरीष महाले, पोअं सोनु खाडे, पोअं मच्छिंद्र वाकचौरे, पोअं गोरख साळुंके, पोअं सुजित जाधव, पोअं रमेश गोसावी, पोअं भागवत थविल, पोअं शिवम साबळे, पोअं सतीष जाधव व गुन्हेशाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी सपोनि हॅमत तोडकर, श्रेणी पोउनि मुक्तार पठाण, श्रेणी पोउनि चंद्रकांत गवळी, श्रेणी पोउनि गुलाब सोनार, पोहवा अतुल पाटील, पोअं जितेंद्र वझरे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत हे करीत आहेत.