क्राईम

नाशिक मनपाचे विद्यार्थी रौनक शर्मा व अमरीत वादी यांची ‘इन्स्पायर अवॉर्ड’ साठी निवड ;शाळा क्रमांक १८ चे आणखी एक सुयश 


नाशिक मनपाचे विद्यार्थी रौनक शर्मा व अमरीत वादी यांची ‘इन्स्पायर अवॉर्ड’ साठी निवड;

शाळा क्रमांक १८ चे आणखी एक सुयश 

नाशिक:प्रतिनिधी

Advertisement

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून दरवर्षी भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेले व राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम समाजापर्यंत पोहचावे यासाठी ‘इन्स्पायर अवॉर्ड’ ही स्पर्धा राबविली जाते. विद्यार्थ्याना ते सामोरे जात असलेल्या विविध समस्यांवर उपाय शोधून नवनवीन प्रयोग राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. संपूर्ण देशातून उपक्रमशील विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मदतीने या स्पर्धेत नामांकन करतात व त्यातील निवडक असे नावीन्य असलेल्या प्रयोगांची निवड ‘इन्स्पायर अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी केली जाते. या वर्षी ‘इन्स्पायर अवॉर्ड २०२३/२४ साठी नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील इयत्ता सातवी मधील रौनक शर्मा व अमरीत वादी यांची निवड झाली आहे. नुकतीच मानक इन्स्पायर अवॉर्डच्या वेबसाईटवरून याची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांस नव कल्पनेसाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत. भारताने जगाचे नेतृत्व करावे व विश्वगुरु बनावे यासाठी भारत सरकार इनोव्हशन अर्थात नवकल्पनेवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षांपासून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका कुंदा बच्छाव ,अनिता जाधव, ममता सुंठवाल यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनपा प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील,शाळेचे केंद्रप्रमुख बाळासाहेब अहिरे ,मुख्याध्यापक वीणा देशमुख ,शाळेतील सर्व शिक्षक व पालकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *