युवा सेनेच्या आणखी एका मागणीला यश; वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ; आता मिळणार दरमहा १८ हजार रुपये
युवा सेनेच्या आणखी एका मागणीला यश;
वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ; आता मिळणार दरमहा १८ हजार रुपये
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शासकीय व अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थीच्या (इंटर्नशिप) विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा १८ हजार रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. एक जानेवारी २०२४ रोजी युवा सेनेच्या पदाधिकारी शर्मिला येवले यांच्या नेतृत्वात ऋषी सांगळे, वैभव लोमटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीला शासनाच्या या निर्णयाने न्याय दिल्याची भावना शर्मिला येवले यांनी आपली दुनियादारीशी बोलतांना व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खा. डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे यांनाही येवले यांनी धन्यवाद दिले आहेत.
परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांनादेखील इंटर्नशिप कालावधीसाठी १८ हजार रुपये विद्यावेतन या निर्णयामुळे मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना पूर्वी ११ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत होते ते आता फेब्रुवारी, २०२४ पासून दरमहा १८ हजार रुपये देण्यात येणार आहेत.