बाल दिन :- एका वेड्याची जयंती…
बाल दिन :- एका वेड्याची जयंती…
१४ नोव्हेंबर… बाल दिन.. भारतात सर्वदूर उत्साहात साजरा झाला.बाल दिन याच दिवशी का साजरा होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे, हा दिवस मुले म्हणजे देवाच्या सहवासातील फुले असं मानणाऱ्या एका वेड्याचा हा जन्म दिवस. मुलांवर प्रचंड प्रेम करणारा हा वेडा.. होय वेडाच म्हणावे लागेल..
ज्यांनी आपलं स्वराज भवन,१९०० साली वीस हजार रुपयांना विकत घेतलेले आणि नंतर कित्येक रुपये खर्च करून उभारलेला महाल देशाला दान केला…
त्यानंतर घेतलेलं आनंद भवन हे घर देखील १९७० साली दान केलं.या दोन्ही वास्तू अलाहाबाद येथीलच…
भारत स्वतंत्र झाल्यावर देशाची धुगधुग करणारी आर्थिक नाडी स्थिर करण्या साठी आपल्या एकूण २०० कोटी रुपयां पैकी 196 कोटी रुपये १९४७ साली देशाला दान केले.
त्यावेळी सोन्याचा भाव होता फक्त ८८ रुपये तोळा…
१९६ कोटी रुपयात २२,५००,००० तोळे खरेदी केले असते तर अलाहाबाद मधील महाल, घर सोडले तरी केवळ सोन्याची किंमत किती होईल,याचा विचार केला तर डोळे पांढरे होतील.
एवढी संपत्ती केवळ महात्मा गांधींच्या सांगण्यावरून दान करणारा वेडा नाहीतर काय….?
शिवाय आयुष्यातील ऐन तारुण्यातील महत्त्वाचा तीन हजार दिवसां पेक्षा जास्त काळ नऊ वेळा झालेल्या शिक्षा भोगत तुरुंगात काढला…
वेडपटपणाच ना…?
विद्यमान शहाण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा वेडपट पणा भारताचा सार्थ अभिमान आहे.
(संतोष गायधनी यांच्या वॉलवरून)