कोणी घर देत का घर…? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आजही 22 कुटुंब रस्त्यावरच -चंदन पवार नाशिक प्रतिनिधी
कोणी घर देत का घर…?
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आजही 22 कुटुंब रस्त्यावरच -चंदन पवार
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………………………………………
नाशिक प्रतिनिधी
आपले स्वतःचे घर असावे ही इच्छा गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत असणे यात काहीही गैर नाही,श्रीमंत आपल्याकडे असलेल्या संपत्तीमुळे सहजच घर घेतो परंतु, गरिबासाठी पालापाचोळ्याची झोपडी उभी करणे सुद्धा त्याच्यासाठी खूप मोठे संकट असते, दैनंदिन जीवन जगत असताना त्याची मोठी फरफट होत असते, परिवाराचे एक वेळचे पोट कसे भरावे ही चिंता त्याला रोज भेडसावत असते, त्यामुळे तो घर घेण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, अशा वंचित लोकांच्या मदतीसाठी “सरकार” नावाची एक व्यवस्था आहे, ती त्या गरीब वंचित शोषित लोकांसाठी काम करीत असते, परंतु सरकारमधील काही बेजबाबदार आणि अप्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गरीब परिवार आज ही अनेक सुविधांपासून आणि योजनांपासून वंचित आहेत.ज्याच्याकडे घर आहे त्याला दुसरे सरकारी घर मिळत आहे असे घर लाटणारे अनेक लोक दिसून येतील, जर घरकुल योजनेची कसून चौकशी केली तर सत्य नक्कीच बाहेर येईल, सरकार गरीब लोकांसाठी अनेक योजना आणत असते परंतु ती योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही हे सत्य लक्षात घ्यावे लागेल, असेच एक नागडे सत्य पाथर्डी रोड वर बघायला मिळेल.
पाथर्डी गाव सर्कल ते पार्कसाईड सोसायटीच्या दरम्यान रस्त्याच्या काठावर झोपडपट्टीतील परिवार प्रशासनाकडे “घर देता का घर” अशी मागणीही करीत नाहीत, कारण त्यांना हे माहीतच नाही की सरकारकडून गरिबाला घर सुद्धा मिळते आणि आपल्यासाठी काही योजना सुद्धा आहेत, कारण अशा खऱ्या लोकांपर्यंत ना कर्मचारी पोहोचतो ना अधिकारी, याचे कारण म्हणजे अधिकारी आपल्या वातानुकूलित कॅबिन मध्ये बसून सरकारी चहा कॉफी रिचवत असतात, थंडगार हवा खात खुर्चीची उब घेत ही लोक फील्डवर जाण्यासाठी कचरतात आणि जर वेळ मिळाला तर सरकारी कार वापरून आपली खाजगी कामे ड्युटीच्या वेळेत करून घेतात, परंतु फिल्डवर जाऊन वंचित लोकांची माहिती घेत नाहीत,अशा काही अधिकाऱ्यांमुळे आज सरकार बदनाम होते आहे, माझी सरकारला विनंती आहे अशा कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारने हेरून त्यांची बदली अशा जिल्ह्यात करावी जिथे यांना फिल्डवर जाण्यापासून पर्याय नसावा, घरातील साधी वस्तू सुद्धा घेण्यासाठी यांना बाहेर पडावे लागेल अशी व्यवस्था केली तर रस्त्याने जाताना त्यांचे डोळे उघडे असल्यामुळे लोकांच्या समस्या तरी त्यांना दिसतील.
या विषयी अधिक भाष्य करतांना नमो विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष तसेच भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.चंदन लोटनराव पवार म्हणाले,या 22 परिवारांशी बोलल्यानंतर कळले की त्यांना कुठल्याही योजनांची माहिती होत नाही, सरकार घर देते ही पुसटशी कल्पना सुद्धा त्यांना नव्हती, त्यामुळे आजही असे अनेक परिवार नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात आहेत,ज्यांना घराची नुसती गरज नसून आवश्यकता आहे, प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे त्यांची छोटी छोटी बाल बच्चेही थंडी आणि पावसाच्या दिवसात वर्षानुवर्ष हालअपेष्टा सहन करीत आहेत, यातील काही परिवार केसांवर भांडी विकण्याचे, बिल्डिंगवर कामासाठी जाणारे, डोंबारीचा खेळ करणारे अशी विविध कामे करणारी आहेत, त्या परिवारातील महिलांना आणि तरुण मुलींना सकाळच्या प्रात:विधी साठी झाडाच्या आड मोकळ्या पटांगणात जावे लागते, त्यामुळे त्यांचे जीवन धोकादायक बनले आहे, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही, म्हणजेच काय तर ते शहरात राहत असूनही जंगलात जसे राहतो त्या पद्धतीने जीवन जगत आहेत, प्रशासनातील अप्रामानिकपणामुळे भारत सरकारच्या “स्वच्छ भारत अभियानाची” सुद्धा परवड चालली आहे.प्रधान मंत्री घरकुल योजना आणि महानगरपालिका प्रशासनातील कर्मचारी यांना एवढी मोठी वस्ती माहितच नाही असे शक्यता नाही, ही वस्ती माहीत असूनही या ठिकाणी फिरते शौचालय का ठेवले गेले नाही? त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का केली गेली नाही? असे एक अनेक नव्हे हजारो प्रश्न बाहेर येत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि प्रशासनाने त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याची गरज निर्माण झाली आहे, प्रशासनाने या सर्व गोष्टीची पाळीमुळे शोधणे खूप गरजेची आहेत, जर या 22 परिवारांना घर मिळाले नाही तर पवार हे त्या परिवारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत, प्रशासनाने तात्काळ झोपेचे सोंग घेण्याचे सोडून या ठिकाणी जाऊन तेथील लोकांचा सर्वे करून त्यांची नावे, कागदपत्र घेऊन त्यांना घर मिळवून देण्याची व्यवस्था करावी, ज्यांना कळते आणि ज्यांना माहित आहे की सरकारकडून आपल्याला घर मिळू शकते तो तर म्हणू शकतो “कोणी घर देत का घर” परंतु ज्यांना माहीतच नाही अशा वंचित परिवाराला हे सुद्धा म्हणता येत नाही कोणी घर देते का घर…
प्रशासनाने लवकरच ॲक्शन मोडमध्ये यावे आणि त्या परिवारांना आणि शहरातील ईतर वंचित परिवार ज्यांना खरंच घराची गरज आहे त्यांना घर देण्याची व्यवस्था करावी, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला घर मिळावे आणि ते आम्ही देवू, घरापासून कोणीही वंचित असणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली आहे, त्यामुळे प्रशासनाने पंतप्रधानांच्या स्वप्नाला जागून,ज्याला घर नाही त्याला घर देण्यात यावे अशी मागणी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे, सोबत सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब बोडके उपस्थित होते.