पुरस्कारांच्या बाजारातील भाऊ गर्दीत उपेक्षितांच्या कर्तुत्वाला सन्मानित करण्याचे धाडस ; महाराष्ट्र माझा न्युजचा द्वितीय वर्धापन दिन दिमाखात साजरा
पुरस्कारांच्या बाजारातील भाऊ गर्दीत उपेक्षितांच्या कर्तुत्वाला सन्मानित करण्याचे धाडस ;
महाराष्ट्र माझा न्युजचा द्वितीय वर्धापन दिन दिमाखात साजरा
मराठी संस्कृती जतन करा
- ………………………………………..,…………………………………नाशिक- प्रतिनिधी
पुरस्कारांच्या बाजारात उपेक्षित,घटकांच्या कर्तुत्वाला सन्मानित करण्याचे धाडस द्वितीय वर्धापन दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र माझा या वृत्त वाहिनीने दाखविले. पत्रकारितेने आपली जबाबदारी ओळखून समाजाचा आवाज व्हावे हाच संदेश या सोहळ्यातून पाझरला.वेगवेगळ्या विचार पिठावरून तत्वज्ञानाचे डोस पाजणारे शहाजोग प्रत्यक्षात विविध शिर्षाखाली पुरस्कारांचा अक्षरशः लिलाव करीत असतांना, त्याच भाऊ गर्दीच्या गालावर सणसणीत चपराक मारणारा हा सोहळा नवा पथ निर्माण करणारा ठरला. याच अर्थाने हे धाडस ठरले.
महाराष्ट्र माझा न्युज चैनल च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र माझा गुणगौरव सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र माझा न्युज चैनलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांच्या संकल्पनेतून, आणि सर्व प्रतिनिधींच्या सहकार्यातून आयोजित कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून वेचक अशा ,तळागाळातील कर्मचाऱ्यांचा, समाज घटकांना विचार पिठावर बोलावून त्यांच्या सेवेला खऱ्या अर्थाने मानवदंना दिली.नाशिक शहर पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी , नाशिक जिल्हा रुग्णालय येथील परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, महानगरपालिका नाशिक येथील स्वच्छता कर्मचारी, कलाक्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील , नाशिक, पुणे, मुंबई, सापुतारा, कळवण, मालेगाव, मनमाड, येवला नांदगाव, केडगाव, दौंड, सोबतच गुजरात, राजस्थान या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांसाठी तळागाळात काम करणाऱ्या उत्कृष्ट समाजसेवकांसह, आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या स्वाभिमानी पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित असलेला इंडिया स्ट्रांगेस्ट मॅन म्हणून किताब मिळवलेला, भारतभर वेट लिफ्टिंग मध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 25 गोल्ड मेडल विजेता देव महेंद्र चव्हाण प्रमुख आकर्षण ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
विचार पीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र चव्हाण नंदुरबार शहर, नाशिक शहर महानगरपालिका उपायुक्त डॉ. मयूर पाटील , रिटायर पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे,शशिकांत पगारे, कामगार नेते राजाभाऊ सौदे, संपादक जनार्दन गायकवाड सह कार्यकारी संपादक संजय मिश्रा आदींची उपस्थिती होती.
तळागाळातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांपर्यंत उपस्थित असणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गुणगौरव सोहळ्यात समाजातील प्रत्येक घटकाने महाराष्ट्र माझा न्यूजच्या कार्याबद्दल संपादकांसह संपूर्ण टीमचे शब्द सुमनांनी भरभरून कौतुक केले.
नाशिक ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश सुर्वे, गुंडाविरोधीपथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाचे पवन परदेशी आणि सचिन करंजे, पत्रकार कुमार कडलग, पत्रकार देवानंद बिरारी, माहिती अधिकार कायदा जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, राजेंद्र जडे महाराष्ट्र भर शिवकन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीमती संगीता सोनवणे, यांनी आपली प्रमुख उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मर्दानी फाउंडेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती ज्योतीताई गायकवाड यांनी केले.
तर आभार प्रदर्शन संजय मिश्रा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, संजय मिश्रा दौंड,स्वप्निल गायकवाड, विवेक बनकर, प्रणिता पाटील नाशिक, भागीरथ आतकरी इगतपुरी, भगवान खरे कळवण, विकास साळुंके केडगाव, शंकर गायकवाड सापुतारा, राजेश भडांगे विंचूर, राहुल कुलकर्णी निफाड, भगवान ढेरे बीड, उत्तम रौंदळ सटाणा, सह सर्व प्रतिनिधींनी योगदान दिले.