महापरिवर्तन महाशक्तीच्या संयुक्त विजय निर्धार मेळाव्यात करण गायकर यांचा परिवर्तनाचा संकल्प; प्रतिस्पर्धी एकाच नाण्याच्या दोन बाजू ;जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा संघर्ष
महापरिवर्तन महाशक्तीच्या संयुक्त विजय निर्धार मेळाव्यात करण गायकर यांचा परिवर्तनाचा संकल्प;
प्रतिस्पर्धी एकाच नाण्याच्या दोन बाजू ;जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा संघर्ष
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्रात घराणेशाही विरुद्ध सामान्य, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष नव्याने सुरु झाला असून त्याची झलक मधुरम लॉन्स येथे झालेल्या बहुजन मेळाव्यात पहायला मिळाली असून पूर्व नाशिक विधानसभा मतदार संघात यंदा परिवर्तन होऊन त्याच त्याच चेहऱ्यांना वैतागलेली जनता करण गायकर यांच्या माध्यमातून नवा पर्याय देणार असल्याच्या भावना असंख्य उपस्थितांनी व्यक्त केल्या.
पूर्व नाशिक विधानसभा मतदार संघातून महा परिवर्तन शक्ती या तिसऱ्या आघाडीच्या वतीने महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून करण गायकर हे निवडणूक लढवीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, कोल्हापूरच्या गादीचे वारस संभाजी राजें छत्रपती, कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा आवाज म्हणून ओळख असलेले आ. बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी,या फुले शाहू आंबेडकरांचा वारसा खऱ्या अर्थाने जपणाऱ्या नेत्यांचे नेतृत्व लाभलेल्या महा परिवर्तन शक्तीचा विजयी संकल्प मेळावा मधुरम लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंचवटी, नाशिकरोड परिसरातील हजारो फुले शाहू आंबेडकर चाहते उपस्थित होते.
यावेळी अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यासह मराठा आरक्षण चळवळीतील असंख्य कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. अनेक संघटनांनी या मेळाव्यात उपस्थित राहुन करण गायकर यांना पाठिंबा देऊन विजयासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. पँथर क्रांतीवीर सेनेचे संस्थापक, कामगार नेते,छावा क्रांतीवीर सेना केंद्रीय कार्य अध्यक्ष विजय वाहुळे यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी अंतरवाली सराटी येथे गेले असतानाच एक किस्सा सांगितला.देवळाली सारख्या राखीव मतदार संघातून गेल्या सतरा वर्षांपासून खांद्याला खांदा लावून सुख दुःखात सोबत करणाऱ्या विजय वाहुळे यांना देवळाली या राखीव मतदार संघातून संधी द्यावी असा आग्रह करण गायकर यांनी जरांगे यांच्याकडे धरला होता, असे जाणीव ठेवणारे करण गायकर यांना प्रचंड मतांनी निवडून विधानसभेत आमदार म्हणून निवडून पाठवा असे आवाहन वाहुळे यांनी केले.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या महापरिवर्तनाच्या संकल्पात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, महाशक्ती प्रहार जनशक्ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आणि छावा क्रांतिवीर सेनेच्या संयुक्त विजय निर्धार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.मधुरम लॉन्स,निलगिरी बाग येथे झालेल्या या मेळाव्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक नेते,पदाधिकारी,व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
गायकर करण पंढरीनाथ यांचा विरोधात उमेदवारांची खुलासे
या मेळाव्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार करण पंढरीनाथ गायकर यांनी आपल्या विरोधातील दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी समजावून सांगितली. ते म्हणाले,”हे दोघेही उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच प्रतिनिधी असून फक्त नाव वेगळी आहेत. नाण्याच्या दोन बाजूसारखे असलेले हे उमेदवार फक्त पक्ष वेगळा दाखवून एकत्रित भूमिका निभावत आहेत.त्यामुळे या मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची थेट लढाई सुरू आहे.”
जनशक्तीच्या लढाईसाठी निर्धार:-
करण गायकर म्हणाले की,”मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येणारा,चळवळींमध्ये लढणारा कार्यकर्ता आहे.नाशिक पूर्व मतदारसंघाच्या विकासासाठी आयुष्यभर कटिबद्ध राहणार आहे. तुमचे मतदान वाया जाणार नाही,याचे मी वचन देतो.” त्यांनी मतदारांना आश्वासन दिले की, आपल्या आशीर्वादाने परिवर्तन निश्चितच साध्य होईल,आणि मतदारसंघातील जातिवाद तसेच घराणेशाही संपविण्याचा निर्धार व्यक्त केला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने बदल घडवण्याचा संकल्प:-
करण गायकर यांनी छत्रपती संभाजी महाराज व परिवर्तन महाशक्तीने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.”माझ्या प्रयत्नांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला नाशिक पूर्व मतदारसंघातून पहिला विजय मिळवून देणार आहे,” असे ते म्हणाले.त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या लढाईत आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
धनशक्तीला जनशक्तीचे आव्हान:-
“पैशाच्या जोरावर निवडणूक विकत घेण्याचा प्रयत्न करणार्या उमेदवारांना लोकशाहीतून मतदार राजाने २० तारखेला मतदान पेटीतून उत्तर द्यावे,” असे आवाहन करण गायकर यांनी केले. यावेळी परिवर्तन महाशक्ती मधील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना छावा क्रांतिवीर सेना ऑल इंडिया पॅंथर रिपब्लिकन सेना आदींसह विविध घटक पक्षांचे व संघटनेचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.