देवळाली मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारअविनाश शिंदे यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन; श्रीमती लता गोडसे यांची प्रमुख उपस्थिती
देवळाली मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारअविनाश शिंदे यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन;
श्रीमती लता गोडसे यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक-प्रतिनिधी
देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अविनाश शिंदे यांच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला आहे. त्यांना सर्व थरातून पाठिंबा मिळाला आहे. सुजात आंबेडकर यांच्या सहा तारखेच्या प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे. वातावरण आहेदरम्यान अविनाश शिंदे यांनी काल संसरी येथे जाऊन दिवंगत खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी शिंदे यांच्या कार्या अहवाल पुस्तकेचे अनावरण श्रीमती लत्ता ताई गोडसे व माजी सरपंच युवराज गोडसे यांच्या हस्ते झाले.
राजाभाऊ गोडसे यांच्या आठवणीना यावेळी उजाळा मिळाला.येथील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.राजाभाऊ यांच्या भाऊंच्या काळात झालेल्या विविध कामांचा यावेळी गौरवाने उल्लेख करण्यात आला. श्रीमती लता गोडसे यांनी अविनाश शिंदे यांचे औक्षण करून विजयी भव असा आशीर्वाद दिला.
यानंतर अविनाश शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी ग्रामीण भागाचा दौरा करून विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी शिंदे यांचे दीर्घ स्वागत व औक्षण करण्यात आले. अनेकांनी शिंदे यांना मदत म्हणून आपल्या खिशातून काही रक्कम काढून दिली. तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी ही आमची छोटीशी भेट अशा त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया बरच काही सांगून गेल्या.