क्राईम

नक्की काय घडले नाफेडच्या कार्यालयात ; नाफेड भ्रष्टाचार सरकार पुरस्कृत असे शेतकरी का म्हणतात? नाफेडचे अधिकारी खरोखर कठपुतली आहेत का?


नक्की काय घडले नाफेडच्या कार्यालयात ;

नाफेड भ्रष्टाचार सरकार पुरस्कृत असे शेतकरी का म्हणतात?

नाफेडचे अधिकारी खरोखर कठपुतली आहेत का?

 

 

वणी सुरेश सुराशे

 

साधारण ३ अडवड्यापूर्वी दि 10 सप्टेंबर रोजी शेतकरी संघर्ष सभा नाफेड भ्रष्टाचारासंबंधी जाब विचारण्यासाठी नाफेड कार्यालयात पोहोचली होती..नाफेडच्या गलथान कारभाराबद्दल येवला येथील एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती,त्याच्या चौकशीसाठी पश्चिम विभागीय प्रमुख विना कुमारी यांचे पथक नाफेड कार्यालयात दाखल झाले होते..

*त्यावेळी नाफेड व एनसीसीएफ मधील घोटाळा कसा होतोय त्याची माहिती त्यांना देत काही कंपन्याचे री ऑडिट करण्याची मागणी शेतकरी संघर्ष सभेने केली..* सुरुवातील विना कुमारी यांनी आमची मागणी मान्य केली नाही परंतु काही वेळ चर्चेनंतर त्या तयार झाल्या..आम्ही त्यांना मोजक्या 3 कंपन्यांची नावे दिली त्यात मल्टिस्टेट प्रोटीस्ट,ऑरगॅनिको आणि ध्येयपूर्ती या कंपन्या होत्या..पुढील 10-15 दिवसाचा वेळ द्या मी री ऑडिट करुन तुम्हाला कळवते अस सांगत त्या निघून गेल्या..

Advertisement

 

 

*नाफेडचा स्टॉक आम्ही थांबवू शकणार नाही..शिवाय आम्हाला संशय असल्याने नाशिक भागातील 110 कोटी रुपये आम्ही थांबवले आहेत असही त्यांनी सांगितल..परंतु आम्हाला काही सापडल नाही अशी दुटप्पी भूमिका त्यानी घेतली..आम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोललो तर त्या म्हणे आम्हाला काही सूचना असतील तर करा आम्ही पुढच्या वेळी बदल करू पण आताच्या भ्रष्टाचारावर त्यांनी ब्र सुद्धा काढला नाही..*

3 आठवड्यानंतर आम्ही चौकशीसाठी गेलो असता त्यांनी कोणतीही चौकशी केली नसल्याचे कळले तेव्हा आम्ही नाफेड च्या ब्रांच मैनेजर पादडेच्या मोबाईलहून त्यांच्याशी संपर्क साधला असता वीणा कुमारी यांनी मी कोणतही ऑडिट करणार नाही,शिवाय मी कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही.. कोणाही शेतकऱ्यांना मी काहीच माहिती देणार नाही तुम्हाला माहिती हवी असेल तर भारत सरकार कडे जा.अशी उर्मटपणे उत्तरे दिली..

यावेळी किरण सानप यांनी भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी व सत्तेतील अनेकांचे यात हात असल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय..विधानसभेपूर्वी हे प्रकरण नाफेडचा बफर स्टॉक संपवून मिटवण्याचा प्रयत्न सरकार व नाफेड अधिकाऱ्याचा आहे असा आरोप केला..

आम्हाला माहिती न दिल्यास व हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकरी संघर्ष सभेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करू असा इशारा सुनील मालुसरे यांनी दिला. यावेळी शेतकरी संघर्ष सभेच्या वतीने किरण सानप,सुनील मालुसरे,प्रभाकर धात्रक,धर्मराज शिंदे,अशोक गायधनी,राजेंद्र ठोंबरे,शांताराम राजनोर,ज्ञानेश्वर काळे,संतोष मार्कंड,सुरेश सुरासे आदी उपस्थित होते…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *