नाफेडच्या भ्रष्टाचारविरोधात शेतकरी आक्रमक ; पिंपळगाव बसवंत कार्यालयात घेराव
नाफेडच्या भ्रष्टाचारविरोधात शेतकरी आक्रमक ;
पिंपळगाव बसवंत कार्यालयात घेराव
वणी / सुरेश सुराशे
नाफेड कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचारा विरोधात शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज शुक्रवार दि.४/१०/२०२४रोजी पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयात शेतकरी सभा तसेच शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला.या शिष्ट मंडळाने नाफेड व्यवस्थापकीय अधिकारी विना कुमारी यांना फोन केला असता उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांना यात सरकाराचा संबंध असल्याची शंका उपस्थित केली आहे.या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी येणाऱ्या काळात झाली नाही तर शेतकरी संघर्ष सभेच्या नेतृत्वात शेतकरी रस्त्यावर उतरतील.असा इशाराही देण्यात आला.या वेळी शेतकरी संघर्ष सभेचे किरण सानप, सुनील मालुसरे, प्रभाकर धात्रक, धर्मराज शिंदे, राजेंद्र ठोंबरे, शांताराम राजनोर, ज्ञानेश्वर काळे, संतोष मार्कंड, सुरेश सुराशे व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.