क्राईम

Sad news :अंबड गोपनीय विभागाचे हसतमुख पोलिस कर्मचारी सचिन सोनवणे यांचे कर्तव्यावर निधन ; Bad news :- कायदा आणि जनतेतील सेतू कोसळला 


Sad news :अंबड गोपनीय विभागाचे हसतमुख पोलिस कर्मचारी सचिन सोनवणे यांचे कर्तव्यावर निधन

Bad news :- कायदा आणि जनतेतील सेतू कोसळला 

नवीन नाशिक प्रतिनिधी

Advertisement

अंबड पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलिस कर्मचारी सचिन सोनवणे(वय४६ रहा गौळाणे रोड नाशिक)हे मंगळवारी (दि १३रोजी) कर्तव्यावर असतांना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अंबड पोलीस ठाण्यासह आयुक्तालय हद्दीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन सोनवणे आपले कर्तव्य निष्ठेने बजावत असतांनाही त्यांनी सर्व पक्षीय पदाधिका-यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध जोडले होते.त्यांच्या अकाली निधनाने पोलिस वर्तुळासह सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह त्यांचे नातेवाईक तसेच मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *