क्राईम

मोठी बातमी: एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला! राजकीय प्रतिक्रिया शांत, चर्चेला मात्र उधाण


मोठी बातमी: एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला!

राजकीय प्रतिक्रिया शांत, चर्चेला मात्र उधाण

घटनास्थळ: खराडी, पुणे

 धाड: ६ जण ताब्यात,अंमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त

 तपास: अंमली सेवनाचे पुरावे शोधले जात आहेत.

 बातमीचा स्रोत: स्थानिक पोलिस दल, गुन्हे शाखा अहवाल आणि घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित माध्यम प्रतिनिधी 

 

पुणे: शहरातील उच्चभ्रू खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई करत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ अटक केली आहे. या पार्टीमध्ये दारू, हुक्का आणि अंमली पदार्थ आढळून आले असून, एकूण ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये २ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे.

 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाचा समावेश होता, अशी माहिती समोर आली. प्रांजल खेवलकर असे त्यांचे नाव आहे

Advertisement

 

एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यामुळे सध्या बोलायला नकार दिला आहे.

 

 गुन्हे शाखेची छापेमारी:

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून, पार्टीदरम्यानच कारवाई केली. सर्वांना तातडीने ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, अंमली पदार्थांचे सेवन झाले का? याचा तपास सुरू आहे.

 

वादग्रस्त सोनाटा लिमोझिन पुन्हा चर्चेत:

प्रांजल खेवलकर यांची आलिशान MH 19 AQ 7800 सोनाटा लिमोझिन कार यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तिच्या अवैध नोंदणीवरून गंभीर आरोप केले होते. हीच गाडी या प्रकरणातही आढळल्याने खळबळ उडाली आहे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *