का झाला असेल आ. अमोल खताळ यांचेवर हल्ला? कोण आहे तो माथेफिरू? हल्ल्याचा आका कोण? राजकीय प्रतिस्पर्धी की…..?
का झाला असेल आ. अमोल खताळ यांचेवर हल्ला?
कोण आहे तो माथेफिरू?
हल्ल्याचा आका कोण? राजकीय प्रतिस्पर्धी की…..?
आजच्या आपल्या दुनियादारीचे शीर्षक आहे का झाला असेल आ. अमोल खताळ यांचेवर हल्ला?
कोण आहे तो माथेफिरू?
हल्ल्याचा आका कोण? राजकीय प्रतिस्पर्धी की…..?
संगमनेरकरांनों या शेवटच्या की.. मध्येच या प्रश्नाचे उत्तर दडलेले असू शकते. मात्र त्या उत्तराच्या तर्काला स्पर्श करण्यापूर्वी त्या गर्दीत काय घडले आणि हल्लेखोर पकडल्यानंतर घटनास्थळी सुरु असलेल्या चर्चेची थोडी उजळणी करु या..
प्राप्त माहितीनुसार आ. खताळ हे नाशिक पुणे मार्गावरील मालपाणी लॉन्स येथील राजस्थान मित्र मंडळाच्या संगमनेर फेस्टिवलचे उदघाटन करण्यासाठी गेले होते. उदघाट्न आटोपून बाहेर पडत असतांना, नेहमीच्या सवयीप्रमाणे आमदार खताळ हे आपल्या हसतमुख चेहेऱ्याने प्रत्येकाशी हस्तांदोलन करीत होते त्याच गर्दीतून एक तरुण चेहरा पुढे येतो. हस्तांदोलन करण्यासाठी पुढे येतो. काही क्षण एकमेकांशी हसतात असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. दुसऱ्याच क्षणी त्या तरुणाने अमोल खताळ यांचेवर त्या तरुणाने हल्ला केल्याची चर्चा वेगाने पसरते. आणि मग सुरु होतो वातावरणात थरार. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार संतप्त जमावातून आणखी काही माथेफिरू दगड भिरकावून मालपाणी लॉन्सच्या निर्जीव काचांवर आपला राग काढतात. त्यात काही काचाही फुटतात. दरम्यानच्या काळात त्या कथित हल्लेखोराला सुखरूप ऑफिसच्या एका खोलीत कोंडून ठेवले गेले होते.या हल्यानंतर खताळ यांच्या समर्थकांचा सारा संशय थोरात तांबे यांच्याकडे गेला नसेल तरच नवल. गर्दीत तशी कुजबुज देखील ऐकायला मिळाली. इतकेच नाही या नंतरचे त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा संकल्प देखील काही अती निष्ठावंतांनी त्याच गर्दीत सोडला देखील.त्यानंतर तात्काळ या हल्ल्यावर स्वतः अमोल खताळ यांची प्रतिक्रिया आली. ती प्रतिकिया अतिशय बोलकी आणि तपासाला दिशा देणारी आहे.
आ. अमोल खताळ म्हणतात,“
या घटनेचा संगमनेर तालुका काँग्रेस आणि विधानपरिषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी तीव्र शब्दात निषेध करून तात्काळ निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.

गेल्या पंधरा दिवसात संगमनेरमध्ये घडलेल्या विविध घटना घडून गेल्यानंतर झालेल्या या हल्ल्यामागे थोरात समर्थकांचाच हात असेल असे गृहीत धरले गेले. त्याप्रमाणे सारी व्युह रचना झाली नसेल तरच नवल. मात्र ज्यांना राजकारण समजतं अशा कुठल्याही जीवंत बुद्धीला हा तर्क पटणार नाही. मुत्सुद्दी राजकारणी एव्हढे स्वस्तातले राजकारण करीत नाहीत. ही साधी बाब ज्यांच्या लक्षात येईल ते असा मूर्खपणा करणार नाही. आ. अमोल खताळ देखील ती चूक करणार नाहीत, अशीच त्यांची प्रतिक्रिया आहे. यथावकाश हल्ल्याचे कारण स्पष्ट होईलच. तसे संकेत देखील मिळू लागले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याची एक पोस्ट एव्हाना व्हायरल होऊ लागली आहे.
खांडगाव येथील असलेल्या प्रसाद गुंजाळ व त्याच्या कुटुंबीयांचे अमोल खताळ यांच्याशी आर्थिक संबंध होते. अनेक दिवसांच्या प्रलंबते नंतर त्यांचे संबंध ताणले गेले होते. त्या रागातून प्रसाद गुंजाळ यांनी थेट अमोल खताळ यांच्यावर जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसाद गुंजाळ हा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून साधा शेतकरी आहे झालेला हल्ला हा आर्थिक संबंधातून असल्याने अधिकचा तपास संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ कुणाल सोनवणे करत आहेत.अशी ती प्रतिक्रिया आहे. अर्थात ही समाजमाध्यमावर व्हायरल झालेली माहिती आहे. त्यात तथ्य किती? हाही एक तपासाचा भाग आहे. अशा घटनेत प्रत्येक जण आपला उल्लू साधण्याचा प्रयत्न करीत असतो. इथे आमदार कोण, व्यक्ती म्हणून नव्हे तर खताळ हे अवघ्या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांच्यावर झालेला हल्ला हा अवघ्या तालुक्यावर झालेला हल्ला मानावा लागेल. हल्लेखोर कुणीही असो, त्याला कुणाचेही पाठबळ असो,पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन हल्ल्याच्या खऱ्या कारणाचा शोध घ्यावाच. आणि हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की आर्थिक वादातून याचा शोध घेऊन संगमनेरकरांची वास्तवाशी भेट घालून द्यावी. राजकीय हल्ला असेल तर त्या हल्ल्याचे आका बिळातून बाहेर काढावेत. आर्थिक व्यवहार हे कारण असेल तर तो तरुण हल्ल्याला उधृक्त का झाला त्याचाही शोध घेऊन त्याच्याही पदरात न्याय टाकावा. याही पलीकडे जाऊन आणखी एखादे दुसरे तिसरे कारण असेल तर तेही शोधून संगमनेरकरांना या फुटकळ राजकारणाच्या बाहेर काढून शांती प्रदान करावी.
जाहीर निषेध आणि निवेदन
संगमनेर शहरात आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीत घडलेली घटना *अत्यंत चुकीची आहे.* आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. पोलिसांनी निपक्षपणे या घटनेची चौकशी करावी व सत्य आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन पोलिसांमार्फतच प्रसारित करण्यात यावे.
– अजय फटांगरे,
अध्यक्ष, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी
– सोमेश्वर दिवटे,
शहराध्यक्ष, संगमनेर शहर काँग्रेस कमिटी
ना. राधाकृष्ण विखे यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध करून अशा हल्ल्याने महायुतीचे आमदार डगमगणार नाहीत, असे म्हणत लोकशाही मार्गाने पराभव पचवता न येणारे असा हल्ला करणार असतील तर महायुतीचे कार्यकर्ते देखील जशाच तसे उत्तर देतील असा आशय असलेली प्रतिक्रिय देत थेट काँग्रेसकडे बोट दाखवले हे विशेष.



