मुख्याध्यापक संघाला विश्वासात घेऊन तालुक्याच्या गुणवत्तेचा विकास करणार :गटशिक्षणाधिकारी – राजेश डामसे
मुख्याध्यापक संघाला विश्वासात घेऊन तालुक्याच्या गुणवत्तेचा विकास करणार :गटशिक्षणाधिकारी – राजेश डामसे
रश्मी मारवाडी सिन्नर
मला विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी खुप योजना व उपक्रम राबवायचे आहेत, यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापकांची साथ हवी आहे . नवोदय , स्कॉलरशिप , एन टी एस, एम एम एस ,चित्रकला स्पर्धा यामध्ये ७०% विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा .१० वी ,१२ वी परीक्षा भयमुक्त व कॉपीविरहीत ‘ वातावरणात पार पाडाव्यात असे आवाहन गट शिक्षणाधिकारी राजेश डामसे यांनी केले.
सिन्नर पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे यांचा सत्कार करताना सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख , कार्यवाह एम डी काळे, विस्तार अधिकारी मंजुषा साळूंके, सांगळे , रामनाथ लोंढे, पी एन पवार, एस एस जगदाळे, जमीर सैय्यद, टी के रेवगडे, प्रभाकर बोडके,बाळासाहेब फड , आर आर दौंड, के .टी पवार, व्ही .डी . बैरागी ,मयुर आव्हाड ,राजेन्द्र महात्मे ,सुरेश देशमुख, सौ अनिता सुर्यवंशी , एम आर कर्डेल, हरिभाऊ लोढे , जे.जे. शिंदे उपस्थित होते.