चांदवड देवळा मतदारसंघात राजकीय भुकंप; राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी घेतली माघार,अपक्ष उमेदवार केदा नाना आहेर यांना जाहीर पाठींबा
चांदवड देवळा मतदारसंघात राजकीय भुकंप;
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी घेतली माघार,अपक्ष उमेदवार केदा नाना आहेर यांना जाहीर पाठींबा
कुबेर जाधव /चांदवड
आज विधानसभेच्या निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी अनेक नाटकीय घडामोडींची पुनरावृत्ती बघायला मिळाली. देवळा चांदवड मतदारसंघातील प्रबळ दावेदार असलेले केदा नाना आहेर यांनी मोठी खेळी करून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते , बाजार समितीचे माजी सभापती डॉ आत्माराम कुंबार्डे , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चांदवड बाजार समितीचे विद्यमान सभापती संजय जाधव, यांनी आज नाट्यमय रीत्या माघार घेत अपक्ष उमेदवार केदा नाना आहेर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.तसेच चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांनी चांदवड येथील मेळाव्यात जाहीर पाठिंबा दर्शविला होता.आज आणखी काही नेत्यांनी अर्ज मागे घेवून देवळा चांदवड महाविकास आघाडीला समर्थन दिले आहे, त्यामुळे विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर , तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कोतवाल यांच्या गोटात खळबळ माजली आहे.तिसरे महापरीवर्तन महाशक्ती चे उमेदवार गणेश निंबाळकर हे सर्व घडामोडी पासुन अलिप्त राहत खेडोपाडी , वाड्या वस्तीवरील जात आपली भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांशी हितगुज साधत आहेत.आज या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून देवळा तालुक्याचे दोन आहेर बंधु व चांदवड तालुक्यातील दोन शिरिष भाउ कोतवाल, महापरीवर्तन महाशक्तीचे गणेश निंबाळकर यांच्यांत खरी लढत होत आहे, या चौघांत कोण बाजी मारतं हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.