क्राईम

मराठा द्वेषी बेजार, अफवांचा बाजार रात्र वैऱ्याची आहे, मराठ्यांनो!जागे रहा… आंदोलन चिरडण्यासाठी कुटील बुद्धी सज्ज झालीये….


मराठा द्वेषी बेजार, अफवांचा बाजार

रात्र वैऱ्याची आहे, मराठ्यांनो!जागे रहा…
आंदोलन चिरडण्यासाठी कुटील बुद्धी सज्ज झालीये….
आपली दुनियादारी विशेष:-
सरकारने आरक्षणाची घोषणा केली नाही तर मी उद्याचा सूर्योदय पाहणार नाही अशी प्रतिज्ञा करून जीवन संपविणारे स्व. आण्णासाहेब पाटील, आपली अवघी उमेद खर्ची करून तारुण्याची होळी करणारे आण्णासाहेब जावळे पाटील आणि आत्महत्या करून शहीद झालेले शेकडो तरूण, जेष्ठ समाज बांधवांचा बळी घेऊन हक्क सरकारने पदरात टाकला ला नाही.त्यानंतर लाखोंच्या तब्बल ५८ मोर्चे काढून विश्व विक्रमी शांततेत  आपले गाऱ्हाणे मांडून शासन व्यवस्थेला जागे करण्याचा प्रयत्नही राज व्यवस्थेला हलवू शकला नाही, तरीही जिद्द न सोडता सनदशीर मार्गाने हक्काची लढाई लढण्याची चिकाटी समाज सोडत नाही. याचा जिवंत दाखला आंतरवली सराटीहून निघालेल्या आणि मारुतीच्या शेपटीसारख्या लांबत जाणाऱ्या मराठा रांगेने दिला. या रांगा पाहून मराठ्यांच्याच जीवावर पोसल्या जाणाऱ्या बांडगुळ, मराठा द्वेषी प्रवृत्तीच्या पोटात धस्स झाले आहे. हा ज्वालामुखी आपले हक्काच्या लढाईत जो आडवा येईल त्याला जाळून पुढे सरकत राहील याची खात्री झाल्याने कुटील कारस्थान करून या आंदोलनासमोर एखादा अडथळा उभा करण्याचा खेळ सुरु झाला आहे यां खेळाचाच एक भाग म्हणून अफवांचा बाजार उठवून मराठा समाजाला चिथावण्याचे  प्रयत्न सुरु आहेत.
इकडे हल्ला झाला, तिकडे ताब्यात घेतले. अशा प्रकारच्या कंड्या पिकवून शांततेच्या मार्गाने सुरु असलेली ही मोठी एक संघ  चळवळ विस्कळीत करण्याची खेळी खेळली जाऊ शकते. म्हणूनच या महत्वाच्या क्षणी समाजाने जागे राहून या बाबीकडे सूक्ष्म नजरेतून पहायला हवे. अफवांवर विश्वास ठेवून यशस्वी होत असलेले हे आंदोलन फसविण्याच्या कुटील खेळाला बळी पडू नये.
कोट्यावधी मराठा मुंबईत याच  शांततेत पोहचणार आहेत.
या गर्दीची राजकारणातील चार पाच डोकी सोडली तर कुठल्याच जाती धर्माच्या सामान्य बांधवाला असुया नाही. त्यांचे राजकारण सरळसोट धावत रहावं म्हणून त्यांचा गर्दीकडे पाहून जळफळाट होत असल्याने अफवा उठवून गरम होणाऱ्या बाजारावर त्यांची दुकानदारी चालविण्याचा त्यांचा धंदा आहे हे लक्षात ठेवूनच या गर्दीला सांभाळा, जपा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *