घरफोडी करणारा आरोपी पोलीसांचे जाळयात; “भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”
घरफोडी करणारा आरोपी पोलीसांचे जाळयात;
“भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”
नाशिक प्रतिनिधी
दि. ०९/१०/२०२४ रोजी रात्री ०१:०० वा. ते ०५:०० वा. चे दस्म्यान सौदागर बिल्डींग, छपरीच्या तालीमचे मागे, नाईकवाडीपुरा, जुने नाशिक येथे राहणारे कैफ मुन्ना पठाण व त्यांचे शेजारी राहणारे मास्टर नईम अन्सारी हे घरात झोपले असतांना त्यांचे घराचे दरवाजे उघडुन घरातील १४,०००/- रोख रक्कम व २०,०००/- रूपये किंमतीचे ०३ मोबाईल फोन असा एकूण ३४,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची तक्रार कैफ मुन्ना पठाण यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा रजि.नं. ३४६/२०२४ भारतीय न्याय संहीता-२०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ (३) अन्वये दि.०९/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पो. नि. गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक (प्रशा.) विक्रम मोहीते यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि/सत्यवान पवार व पथकाने केला. यागुन्हयातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक पध्दतीने व मानवी कौशल्याने तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणुन संशयित आसिफ उर्फ काल्या ईस्माईल शेख, वय २५ वर्षे, रा. गुमशाबाबा दर्गाजवळ, नानावली, भद्रकाली, नाशिक यास ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला असुन सदर गुन्हयात घरफोडी चोरी झालेले २०,०००/-रूपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे असे एकूण ०३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सत्यवान पवार हे करीत आहेत.
पो. आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, सरकारवाडा विभागाचे सहा. पो. आयुक्त नितीन जाधव, वपोनि गजेंद्र पाटील, पो. नि. श्रीनिवास देशमुख,पो. नि . विक्रम मोहीते, भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार, पोहवा सतिष साळुंके, पोहवा कय्युम सैय्यद, पोहवा अविनाश जुद्रे, पोशि दयानंद सोनवणे, पोशि निलेश विखे, पोशि नारायण गवळी, धनंजय हासे यांनी पार पाडली.