‘नावा’ चा उपक्रम:- सोमवारी जाहिरात दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन; मोटिवेशनल स्पीकर गोपी गिलबिले यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी
‘नावा’ चा उपक्रम:-
सोमवारी जाहिरात दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन;
मोटिवेशनल स्पीकर गोपी गिलबिले यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी
नाशिक -प्रतिनिधी
येथील नाशिक ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन तर्फे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त यावर्षी सोमवारी (दि.१४)जाहिरात दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे दु 1.30 वा हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र चे सरचिटणीस ॲड. नितिन ठाकरे, फ्रावशी अकॅडमी चे अध्यक्ष रतन लथ, ग्लोबल पर्सन संजय लोढा हे उपस्थित राहणार असून, कार्पोरेट ट्रेनर गोपी गीलबिले यांचे प्रेरणादायी विचार(मोटिवेशनल स्पीच) ऐकण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमातील जाहिरात विभागाचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, सरचिटणीस मिलिंद कोल्हे पाटील व नावाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.