मराठा आरक्षणावर न्यायालयीन लढाई कडे समाजातील नेत्यांचे दुर्लक्ष : राजेंद्र कोंढरे
.मराठा आरक्षणावर न्यायालयीन लढाई कडे समाजातील नेत्यांचे दुर्लक्ष : राजेंद्र कोंढरे
अकोले ( प्रतिनिधी ):-
मराठा समाजाचे आरक्षणा संदर्भात न्यायालयीन लढाई कडे दुर्लक्ष होत असून हे मराठा समाजाला परवडेल का ? याचा समाजातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, संघटनानी विचार केला पाहिजे असे मत अखिल भारतीय मराठा महासंघा चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले आहे.
श्री. कोंढरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मुख्य न्यायधीश देवेंद्र कुमार उपाध्याय न्या. गिरीश कुलकर्णी न्या. पुनियावाला यांच्या त्रिसदस्यीय घटना पीठासमोर सुनावणी होती. मराठा समाजाला राज्यसरकारने मागासवर्ग आयोगाची शिफारस घेऊन दिलेले आरक्षण संदर्भात सुनावणी आहे. तसेच दुसऱ्या खंडपीठापुढे कुणबी व १ जून २००४ चा कुणबी-मराठा शासन निर्णयाचे अनेक याचिकांमधून आव्हानित केला आहे. गेल्या सात महिन्यापासून यावर सुनावणी सुरु आहे.
या याचिकेतून मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण टिकणे अत्यंत महत्वाचे आहे. तर दुसरीकडे मराठा समाज जे कुणबी प्रमाणपत्र मागणी करत आहे त्याचेही सामाजिक शैक्षणिक मागासलेपण टिकणे महत्वाचे आहे. या दोन्ही बाबी आव्हानीत केल्या गेल्या आहेत.
राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे , रॅली, मेळावे होत असताना हाताच्या बोटावर मोजावे एवढे दोन तीन मराठा प्रतिनिधी सोडून कोणीही या सुनावण्यांना उपस्थित राहत नाही. एवढ्या मोठ्या मराठा समाजाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
उपोषण, मेळावे, आंदोलन, मोर्चे रॅली याचं बरोबर न्यायालयीन लढाई ही अत्यंत महत्वाची असून ही बाब दुर्लक्षुन चालणार नाही. मराठा समाजच्या नेत्यांनी अन संघटनानी विचार केला पाहिजे. मराठे युद्धात जिंकतात अन तहात हरतात म्हणजे रस्त्यावरची लढाई जिंकू अन न्यायालयीन लढाई हरू. अन मग दुसऱ्याला दोष देण्यात येतो. यासाठी मराठा संघटनानी जागरूक राहावे असे आवाहन श्री. राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले.
कोट:- मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दोन निर्णयांच्या विरोधात अनेक याचिका