ताज्या घडामोडी

व्हॉइस ऑफ मीडियाची जिल्हा व शहर कार्यकारणी बिनविरोध


व्हॉइस ऑफ मीडियाची जिल्हा व शहर कार्यकारणी बिनविरोध

परभणी प्रतिनिधी 

 

परभणी जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाची जिल्हा व शहर कार्यकारणी बुधवार दिनांक 26 जून रोजी आयोजित बैठकीत बिनविरोध निवडण्यात आली.

Advertisement

 

परभणी जिल्हा नूतन कार्यकारणी निवडण्यासाठी शहरात स्टेडियम परिसरामध्ये राज्य सहसरचिटणीस डॉ.ज्ञानेश्वर भाले यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने मराठवाडा कार्यवाहक प्रवीण चौधरी, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या विविध उपक्रमाविषयी व संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली व सर्वानुमते कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून कैलास चव्हाण यांची फेरनियुक्ती करण्यात आली तसेच दुसरे कार्याध्यक्ष म्हणून शेख मुबारक यांची निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून शिवाजी वाघमारे, बाळासाहेब काळे, विठ्ठल भिसे, सय्यद युसुफ, जिल्हा सरचिटणीस- श्रीकांत देशमुख,सहसरचिटणीस- विजय कुलकर्णी, कोषाध्यक्ष- मारोती जुंबडे, कार्यवाहक- गणेश पाटील, अमोल लंगर, संघटक-माणिक रासवे,सुधीर बोर्डे, मंचकराव देशमुख, सुदर्शन चापके यांची निवड करण्यात आली. तर प्रवक्ते म्हणून प्रदीप कांबळे यांची तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून आनंद पोहनेरकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून राजेश काटकर,खालेद नाज,मधुकर खंदारे यांची निवड करण्यात आली. शहर कार्यकारणी मध्ये शहराध्यक्ष म्हणून राजन मंगरूळकर, कार्याध्यक्ष म्हणून अनिल दाभाडकर,उपाध्यक्ष दिवाकर माने,सरचिटणीस नरहरी चौधरी,सहसरचिटणीस संतोष मगर, कोषाध्यक्ष गणेश लोखंडे कार्यवाहक शेख नयुम, सल्लागार- संजय भराडे,अक्षय मुंडे,डि.के इनामदार सदस्य म्हणून शैलेश काटकर,गणेश रेंगे,बाळू घिके,सय्यद जमील आदींची निवड करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी साप्ताहिकचे जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा,मंदार कुलकर्णी,माबुद खान आदींची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *