*ऐन आचारसंहितेच्या तोंडावर कळवण सुरगाणा मतदार संघात खड्डे बुजण्याचे काम….*
*ऐन आचारसंहितेच्या तोंडावर कळवण
सुरगाणा मतदार संघात खड्डे बुजण्याचे काम….*
सुरगाणा प्रतिनिधी
गेली साडेचार वर्ष कळवण सुरगाणा मतदार संघ वाऱ्यावर सोडल्याने, जनतेचा आक्रोश कमालीचा वाढला आहे, मतदार संघातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्या साटेलोटे झाल्याने गावोगावी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, हा रोष मतदार संघातील गावोगावी पोहचल्याने अखेर झोपी गेलेले शहरवासीय लोक्रतीनिधी गावाकडे आले आणि ऐने आचारसंहितेच्या तोंडावर मतदार संघातील, मुख्य महामार्ग वणी-कळवण, कळवण-देवळा, कळवण-बोरगांव , कळवण-सटाणा बोरगांव-बर्डीपाडा, या रस्त्यांची आणि गावागावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केलं आहे.
परतीच्या पावसाचे दिवस असल्याने, संध्याकाळी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पडणारा पाऊस आणि आचारसंहिता यामुळें लोकंप्रतीनिधी आणि पाळलेले ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या तीन चार दिवसापासून कळवण सुरगाणा तालुक्यात काम करणाऱ्या व्हीआयपी ठेकेदारांकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे, रस्त्यातील खड्ड्यात पाणी आणि चिखल साचलेला आहे, तो साफ केला जात नाही, काढून टाकला जात नाहीं, त्यातील साचलेले पाणीही काढले जात नाही, लाल माती टाकली जाते मात्र पावसाने लगेचच गाळ होतों आहे, त्यात वावरणारी खडी आणि कच मातीयुक्त आहे, आणि आशा परिस्थितीत एका बाजूला जोरदार पाऊस पडतो आणि त्यात केमिकल युक्त डांबर टाकून खड्डे बुजले जात आहेत, टक्केवारी वजा रकमेतील कामाला कळवण सुरगाणा तालुक्यातील जनता आणि खास करुन युवक संतापजनक विरोध करीत आहे. साडेचार वर्षे झोपलेले आमदार निवडणुक आचारसंहिता तोंडावर आल्यावर जागे झाले का? असा संतप्त सवाल करत आहेत. गेली चार वर्षे मतदार संघातील जनतेला युवकांना, विध्यार्थ्यांना आणि माता भगिनीना मोठया प्रमाणावर मानसीक, शारिरीक त्रास झालेला आहे, अनेक छोटे मोठे अपघात होउन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ही वेदना आणि रोष, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत टक्केवारीच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना आपली जागा दाखवून देतील अशी जनमानसात चर्चा रंगली आहे.