महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कुणाच्या भाग्यात ? अर्थात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? ज्योतिषशास्राची भविष्यवाणी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कुणाच्या भाग्यात ? अर्थात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण?
ज्योतिषशास्राची भविष्यवाणी
राज्याच्या राजकारणावर शनीची दृष्टी, अठरापगड जाती धर्माला सोबत घेऊन राज्याला पुढे नेणारा नवा चेहरा आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडूपाटिल होवू शकतात राज्याचे नवे मुख्यमंत्री.
सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत महायुती किंवा महाविकास आघाडीच्या अंतर्गत फूटीचा बच्चू कडू यांना होवू शकतो फायदा..
दिव्यांगाची सेवा केल्याने बच्चू कडूंना शनी देवता प्रसन्न.
राज्यावरील शनीच्या दृष्टीमुळे बच्चू कडू यांच्याव्यतीरिक्त कुठलाही नेता जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून टिकणार नाही. अन्यथा ८ महिने ते १ वर्ष 3 महिन्यांच्या आत राज्यात लागू शकतात पुन्हा निवडणुका.
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री: राज्याला सध्या शनीची महादशा सुरू आहे,असे अनेक मोठ्या ज्योतिष आणि पंडितांनी भाकित केले आहे. परंतु जो दिव्यांगाची सेवा करतो, त्याला शनी देवता प्रसन्न असते.हे शास्त्र,धर्मात एक सर्वश्रुत मानक आहे. शनी ही ग्रह देवता राजाचा रंक करते आणि रंकाचा राजा हे आपण ऐकलेच असेल. याअर्थाने सध्या राज्यात प्रत्येक पक्षात अंतर्गत आणि बाह्य समीकरणे जमवून सर्व धर्माला आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन विश्वासाने राज्य चालवणारा , सर्वसामान्य जनतेला आवडणारा नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार बच्चूभाऊ उर्फ ओमप्रकाश कडूपाटील हा बहुजन मराठी नेता या कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार राहिल असे भाकीत महाराष्ट्रातील आणि काशी येथील महान पंडित व ज्योतिषांनी केले आहे.