क्राईम

“धनंजय मुंडेंनं अख्खा बीड जिल्हा नासवला, त्याला मंत्रिमंडळातून काढा”, मस्साजोगच्या गावकऱ्यांची अजितदादांसमोर घोषणाबाजी; दादांनी मात्र केली सारवासारव 


“धनंजय मुंडेंनं अख्खा बीड जिल्हा नासवला, त्याला मंत्रिमंडळातून काढा”, मस्साजोगच्या गावकऱ्यांची अजितदादांसमोर घोषणाबाजी;

दादांनी मात्र केली सारवासारव 

 

बीड प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख हत्येने सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. आज १३ दिवसानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

यावेळी गावकऱ्यांनी अजितदादांना घेरलं. ‘अख्खा बीड जिल्हा नासवला, धनंजय मुंडेंला मंत्रिमंडळातून काढा’ अशी मागणीच गावकऱ्यांनी केली.

संतोष देशमुख यांचा आज तेराव्याचा दिवस होता. सकाळी शरद पवार यांनी तर दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन देऊन अजितदादा गावातून निघाले. यावेळी ताफ्याकडे जात असताना मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अजितदादांना घेरलं.

Advertisement

“धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून डच्चू द्याओ दादा असा टाहो फोडला, धनंजय मुंडेंला अजिबात मंत्रिपद देऊ नका. त्याला कोणतंही पद देऊ नका. दादा, जनतेचा आक्रोश आणि म्हणणं ऐकून घ्या, त्याच्या एकट्यामुळे सगळे मयत झाले आहे. हे सगळे खुनी कुत्रे आहेत. धनंजय मुंडेंनी लय पक्षपात केला आहे, त्याने बीड जिल्हा नासवून टाकला आहे, त्याला मंत्रिपद देऊ नका’ अशी पोटतिडकीने गावकऱ्यांनी अजितदादांकडे मागणी केली.

यावेळी “अजितदादा काहीच बोलले नाही, सांत्वनपर बोलले, सारवासारव केली, त्यांच्या बोलण्यात राग आणि संतापही दिसला नाही, आले आणि निघून गेले. गावातील लोकांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्येला १३ दिवस झालेत. अजून ४ माणसं फरार आहे. त्यातील एकही माणूस पकडला नाही.हे ग्रुह विभागाचं अपयश आहे,आमचं काही ऐकून घ्यायचंच नाही तर मग नागपूर, मुंबई मधूनच बोलायचं. अजितदादांनी जे आश्वासन दिलं ते गावकऱ्यांना अजिबात मान्य नाही. वाल्मिक कराडला अटक करा, त्याच्या मुसक्या आवळु असं यायचं आणि सांगून जायचं, हे आम्हाला पटलं नाही’ राग आणि संतापही गावकऱ्यांनी व्यक्त केला.

-कुबेर जाधव नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *