घरात घुसुन जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद; “भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”
घरात घुसुन जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद;
“भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी”
नाशिक प्रतिनिधी
भद्रकाली परिरसरात झालेल्या जबरी चोरीचा तपास भद्रकाली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात करून चोरटे गजाआड केले.
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की,दि. २०/१०/२०२४ रोजी रात्री १२:३० वा. चे दरम्यान गोविंद पलकधारी विश्वकर्मा व त्यांचे दोन मित्र हे त्यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या शितळादेवी मंदिराच्या पाठिमागे, काझीगढी, अमरधामरोड, जुने नाशिक येथील घरात झोपलेले असताना ४ अनोळखी इसम त्यांचे घरात जबरीने घुसुन त्यांनी गोविंद विश्वकर्मा व त्यांचे मित्र यांना प्लायवुडच्या लाकडी फळयांनी मारहाण करून दुखापत केली. तसेच त्यांनी फिर्यादी व त्यांचे मित्राकडील ५०००/- रूपये रोख रक्कम व ६०००/- रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याने त्याबाबत इसम नामे गोविंद पलकधारी विश्वकर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३६१/२०२४ भारतीय न्याय संहीता-२०२३ चे कलम
३०९ (६), ३३२(७), १२७ (२), ३५१ (२) (३), ३ (५) अन्वये दि. २०/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.
गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे),विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक (प्रशा.) यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व पथक यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा मानवी कौशल्याने तपास करून सदर गुन्हयात आरोपी नामे सागर अनिल कुमावत, क्य ३२ वर्षे, रा. शितळादेवी चौक, अमरधाम रोड, जुने नाशिक, रूषिकेश बापु पगारे, वय २६ वर्षे, रा.धर नं. ८१२, काझीगढी, कुंभारवाडा, अमरधामरोड, जुने नाशिक, विकी नरेश शिंदे, वय २३ वर्षे, रा.घर नं. ३८२५, नागझरी शाळेजवळ, नानावली, भद्रकाली, नाशिक, विकी लक्ष्मण ओजे, वय २४ वर्षे, रा. शितळादेवी मंदीरा मागे, काझीगढी, कुंभारवाडा, जुने नाशिक यांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला.सदर गुन्ह्यात जबरी चोरी झालेला ६,०००/-रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असुन गुरुयाचा पुढील तपास सपोनि सत्यवान पवार हे करीत आहेत
सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, शm किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक (प्रशासन), भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार, पोहवा संदीप शेळके, पोहवा. लक्ष्मण After, पोना महेशकुमार बोरसे, पोशि योगेश माळी, पोशि गुरू गांगुर्डे, पोशि जावेद शेख पोशि नारायण गवळी यांच्या पथकाने पार पाडली.