क्राईम

संतोष देशमुख कुटुंबियांच्या वेदना सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का? सरकार आरोपींना पाठीशी घालतेय का? करण गायकर यांचा खडा सवाल 


संतोष देशमुख कुटुंबियांच्या वेदना सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का?

 

सरकार आरोपींना पाठीशी घालतेय का?

 

करण गायकर यांचा खडा सवाल 

 

 

 

नाशिक प्रतिनिधी

 

संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले असतानाही, अद्याप वाल्मीक कराड आणि इतर आरोपींना अटक झालेली नाही. या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद ठरत आहे. सरकारचे मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतचे मौन आणि आरोपींना अद्यापही दिलेले अभय ही गोष्ट सरकारच्या निष्क्रियतेचे प्रतीक बनली आहे.असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तथा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केला आहे.

Advertisement

 

देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश, त्यांच्या वेदना, आणि न्यायासाठी चाललेला लढा हे राज्यातील जनतेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे करत असून एका सामान्य नागरिकाचा अन्यायाविरुद्धचा आवाज सरकारला ऐकू येत नाही का? असा सवाल उपस्थित करून सत्तेत असलेले नेते आणि मंत्री यांना जनतेच्या समस्यांशी काही देणे-घेणे राहिलेले नाही.असा आक्षेप करण गायकर यांनी घेतला आहे.

 

सरकार आरोपींना पाठिशी घालत आहे का?

 

या प्रकरणात सरकारचे हात रक्ताने माखलेले असल्याचा आरोप लोक करत आहेत. न्याय मिळवण्यासाठी संतोष देशमुख कुटुंबीय आणि समर्थकांना सातत्याने आंदोलन करावे लागत आहे. परंतु, सरकारचे दुर्लक्ष आणि आरोपींना अद्यापही दिलेले संरक्षण हे लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांना मारक आहे.

म्हणूनच, सरकारने त्वरीत आरोपींना अटक करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा. अन्यथा, या अन्यायाविरुद्ध राज्यभर जनआंदोलन उभे राहील, ज्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असेल.असा इशारा करण गायकर यांनी दिला आहे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *