क्राईम

महापालिकेच्या बुडाखाली अनधिकृत बांधकामांचा अंधार ; भ्रष्टाचाराचे जाळे खोल खोल? “कायद्याची चेष्टा, नोटीसींचा दिखावा, भ्रष्टाचाराचा दुर्गंध!” “महापालिका नोटीस बजावते,  पैशाच्या खळखळाटात कारवाईचा आवाज मात्र येईना!! कायद्याचा उघड उघड अवमान 


महापालिकेच्या बुडाखाली अनधिकृत बांधकामांचा अंधार ; भ्रष्टाचाराचे जाळे खोल खोल?

“कायद्याची चेष्टा, नोटीसींचा दिखावा, भ्रष्टाचाराचा दुर्गंध!”

“महापालिका नोटीस बजावते,  पैशाच्या खळखळाटात कारवाईचा आवाज मात्र येईना!! कायद्याचा उघड उघड अवमान 

 

नाशिक विशेष प्रतिनिधी

कपालेश्वर परिसरातील अनधिकृत बांधकामाला पंचवटी विभागाने दिलेल्या नोटीसीचा कालावधी संपला, तरीही प्रशासनाने अद्याप कारवाईला हात घातलेला नाही. शहराच्या मध्यवर्ती धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी उभी ठाकलेली हे बेकायदेशीर बांधकाम अद्याप टेचित उभी असून, अधिकारी मात्र ‘मौन व्रत’ घेऊन अतिक्रमणखोरांची उपासना करीत आहेत. त्यामुळे सरळसरळ प्रश्न उभा राहतो, की बुलडोझर थांबवणाऱ्या हातात सत्ता आहे की भ्रष्टाचाराची झाकली मुठ?

आगामी कुंभमेळ्याच्या गर्दीवर धोक्याची घंटा:-

सदरची जागा आगामी कुंभमेळ्याच्या प्रचंड गर्दीच्या दृष्टीने संस्थानने विकत घेतलेली आहे. ही जागा मूळतः यात्रेकरूंना सोयीसाठी वापरली जाणार होती. पण त्याच जागेवर अनधिकृत बांधकाम उभे राहिले, आणि ते काढण्यासाठी तब्बल सव्वा वर्षांपासून जाणूनबुजून चालढकल सुरू आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षेला धोका असूनही महापालिका मात्र हात आखडता घेत आहे, हे धक्कादायक आहे.

बुलडोझरला थांबवणारे हात अधिकारी की बांधकाम माफियांचे ?

नोटीस देणे, पंधरा दिवसांचा कालावधी देणे, आणि मग कोणतीही अंमलबजावणी न करणे, हा प्रकार नागरिकांना चांगलाच संशयास्पद वाटतो आहे. एवढा उघडपणे कायदा मोडूनसुद्धा जर बुलडोझर थांबवला जात असेल, तर यामागे खिसा गरम करण्याचे राजकारण आणि टेबलाखालची सौदेबाजी असल्याचे शहरभर बोलले जात आहे..

राजकारण, पैसा आणि प्रशासन ; त्रिवेणी संगनमत:

राजकारणी मतांच्या आकड्यांसाठी अनधिकृत बांधकामधारकांना आश्रय देतात.

बांधकाम माफिया पैशाचा पाऊस पाडून कायद्याला नाचवतात.

महापालिका अधिकारी या दोघांमध्ये मध्यस्थी करून टेबलाखाली बसून नोटांची उब घेतात.

परिणामी नोटीस ही केवळ जनतेला दाखवण्यापुरती नाटकी कागदपत्रं ठरतात. कारवाई मात्र ‘वरून ऑर्डर नाही’, ‘फाईल अडकली आहे’, ‘खर्चाचा अंदाज बनतोय’ अशा कारणांवर लांबवली जाते.

शहराचा श्वास गुदमरतोय आणि महापालिका प्रशासनाला भ्रष्टाचाराचा ऑक्सिजन.

अनधिकृत बांधकामांचा बोजा वाढला की शहराची रचना विस्कटते, रस्ते अडतात, पाणी-वीज यावर ताण येतो. पण महापालिकेला त्याचे काही देणंघेणं नाही. नागरिक मात्र संतापून म्हणतात, “पैसा दिला की बांधकाम वाचते; अन्यथा बुलडोझर धडकतो.” हीच आज नाशिकची नवीन शहरी नीती बनली आहे.

Advertisement

विश्वासाला तडा – महापालिका की माफियांची गुलामगिरी?

महापालिकेवरचा जनतेचा विश्वास ढासळला आहे. कारवाईच्या नावाखाली फक्त नोटीसींचे नाटक, तर प्रत्यक्षात माफियांची गुलामगिरी. विशेषतः कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात लाखो भाविकांचे जीव धोक्यात टाकून अधिकारी अनधिकृत बांधकामधारकांना वाचवतात, हा प्रकार केवळ भ्रष्टाचार नव्हे तर गुन्हा आहे.

उपाय काय?

प्रत्येक नोटीसीनंतर ठरलेल्या मुदतीत कडक कारवाई अनिवार्य करावी.

कारवाई टाळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनासह फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.

संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक ऑनलाइन पोर्टलवर पारदर्शक व्हावी.

सर्वात महत्त्वाचं,राजकीय दबाव झुगारून निर्णय घेणारे धाडसी प्रशासन उभं राहावं.

मुद्दा केवळ कपालेश्वर जवळील अनाधिकृत बांधकामाचा नाही प्रकरण हे केवळ एका बांधकामाचं नाही;तर अनाधिकृत बांधकाम माफिया” आणि “पालिका अधिकारी” यांचे गुप्त जाळे किती घट्ट विणलं गेलं आहे, याचं जिवंत हे उदाहरण आहे.शहराचा खरा प्रश्न महापालिका कायद्याची अंमलबजावणी करणार की भ्रष्टाचाराच्या फेऱ्यात कायम गुलामगिरी मान्य करणार?हा आहे.

दुनियादारी won’t lie 

…………….

*पंकज त्रिपाठी:सपनोंको चुनीए, ड्रग्ज को नही*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

………..
*राजकुमार राव :अपने सपनोंको ना तोडे, ड्रग्ज को अपनी मेहनत को चुराने ना दे!*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

…………………………………….
*शरद केळकर :अपने मन को मजबूत रखें,किसी भी कठीण समय मे सकारात्मक सोचे और ड्रग्ज जैसे किसी भी चीज से दूर रहे!*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

………………………………………
*मकरंद अनासपुरे :आपल्या मात्या पित्याच्या प्रेमाचा, अभिमानाचा सन्मान करा, कुठलीही नशा त्यांच्या दुःखापेक्षा मोठी नाही, त्यांना दुःख देऊ नका!*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇https://youtu.be/A1450r9cff8?si=q2SK0h1pwWKwwLMm
……*Just Say 👉No Drugs*……


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *