महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब! मराठा समाजाला फसवे आरक्षण देऊन दिशाभूल करू नका:करण गायकर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब! मराठा समाजाला फसवे आरक्षण देऊन दिशाभूल करू नका:करण गायकर
नाशिक प्रतिनिधी
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा आपण शब्द दिला आहे त्याचबरोबर सगे सोयरे या मसुद्याला कायद्यात रूपांतर करून आपण अधिसूचना काढणार होता. ती काढावी ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप करून मराठा समाजाला न्याय देणे आपले कर्तव्य असताना आपण आज जे काही आरक्षण देत आहेत.ते मराठा समाजाची दिशाभूल आहे येणाऱ्या काळात हे आरक्षण टिकले नाही तर समाज देशोधडीला लागेल याला जबाबदार कोण याचे उत्तर आपण द्यावे.
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागास ठरवील्याने मराठा समाजास 50% आतील ओबीसीतुन आरक्षण द्या 50% च्या वरील आरक्षण हे फसवे आरक्षण आहे हे आरक्षण आम्हाला मान्य नाही.
102 घटना दुरूस्ती मध्ये सुधारणा करत 105 घटना दुरूस्ती करून राज्याचा आरक्षण देण्याचे अधिकार दिले.पण ते 50% मर्यादेत राहून देण्याचे अधिकार आहेत पण 50% वर जाऊन आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठी अपवादात्मक व असाधारण परिस्तिथी निर्माण झाली असेल तरच 50% वर जाऊन आरक्षण देता येते पण मा.सर्वोच्च न्यायालय इंद्रासहाणी निवाड्यातील अपवादात्मक व असाधारण परिस्थितीचे निकष काय हे स्पष्ट केले नाहीत आणि 5 मे 2021 जयश्री पाटील विरूद्ध महाराष्ट्र सरकार हा निवाड्यात ही अपवादात्मक व असाधारण परिस्थिती चे निकष काय हे ठरवून दिले नाही.त्यामुळे सरकारने आयोगाकडून कितीही खटाटोप करून अपवादात्मक परिस्थितील म्हणजे 50% वरील आरक्षण दिले तरी ते कोर्टात टिकेल हे कोणी खात्री देऊ शकत नाही.
मा.शिंदे- फडणवीस -पवार सरकारला गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर कुटुंबातील गर्जवंत मराठ्यांना आरक्षण द्यायचेच असेल तर मा.सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या 50% आरक्षण कोटा मर्यादेत मराठ्यांना आरक्षण द्यावे तसेच ” सगेसोयरे ” बाबत अध्यादेश पारीत करावा.
मराठा समाज या आगोदर दोन दोन वेळा 50% वरील आरक्षण घेऊन फसला आता दिस-यादा या मृगजळाला मराठा समाज फसणार नाही.50% वरील आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही.
करण गायकर
मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक