आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा पालघर उद्घाटन सोहळा संपन्न
आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा पालघर उद्घाटन सोहळा संपन्न
मोखाडा :सौरभ कामडी
दिवासी सहकार मंच संचालित ठाणे पालघर आदिम आधार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पालघर शाखा पालघर यांचे आज दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी शांताराम भगत संस्थापक तज्ञ मार्गदर्शक व जिल्हा उपनिबंधक सह संस्था पालघर शिरीष कुलकर्णी साहेब यांचे शुभहस्ते जव्हार गोरवाडी येथे पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
- सर्वप्रथम रॅली काढून व आदिवासी क्रांतिकारक यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच सर्वप्रथम या पतसंस्थेचे प्रास्ताविक विष्णू सांबरे यांनी व्यक्त केले व या पतसंस्थेचे कर्मचारी यांनी पतसंस्थेमध्ये खाते खोलल्यावर नागरिकांना कोणकोणते उपयोग होतील याची सविस्तर माहिती देण्यात आले व ज्या नागरिकांनी या पतसंस्थेमध्ये खाते खोलले त्यांचे या शाखेचे चेअरमन माननीय श्री हरी बरफ यांचे हस्ते त्यांना पासबुक वाटप करण्यात आले.
तसेच शिरीष कुलकर्णी साहेब यांनी बँक चालू करायला आरबीआयकडून किती अवघड आहे याचे महत्त्व सांगितले तसेच आज जास्तीत जास्त बँका कमी होत चाललेत परंतु नवीन पतसंस्था ही पहिल्यांदा या पालघर मध्ये याचे उद्घाटन करण्यात आले आणि याचा फायदा नागरिकांनी पुरेपूर घ्यावा . तसेच हे पतसंस्थेचे संस्थापक शांताराम भगत यांनी पतसंस्था नवीन चालू करण्यासाठी कोणकोणते अडचणी येतात व पतसंस्थेचा ग्रामीण भागातील नागरिकांना कसा फायदा होईल यावर सविस्तर माहिती देण्यात आले तसेच सगळ्यांनी या पतसंस्थेचे सभासद व्हा असे आव्हान करण्यात आले. व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी बुधर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सखाराम पवार यांनी केले.
तसेच याप्रसंगी संस्थापक शांताराम भगत, जिल्हा उपनिबंधक सह संस्था पालघर शिरीष कुलकर्णी साहेब, पतसंस्थेचे चेअरमन हरी बरफ, व्हाईस चेअरमन सुरेश नडगे, सचिव कमल बुधर, खनिजदार राहुल धूम,संचालिका संगीता खाले, डॉ रामदास मराड,तसेच केंदिय कमिटी सदस्य आदिवासी सहकार मंच संचलित सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.