आमदार राहुल ढिकले यांच्या घरावर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा ; लोकप्रतिनिधींनी येणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ
आमदार राहुल ढिकले यांच्या घरावर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा
लोकप्रतिनिधींनी येणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ
नाशिक प्रतिनिधी
सकल मराठा समाज आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात भूमिका मांडावी यासाठी आज नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानासमोर आक्रोश आंदोलन करत निवेदन दिले.
सदर निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलविले असून या अधिवेशनामध्ये विधानसभेचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून
सकल मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसीतून घटनात्मक आरक्षण द्यावे. सरकार दप्तरी सापडलेल्या ५५ लाख नोंदी च्या अनुषंगाने त्वरित ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे.
सगे-सोयरे बाबत जो मसुदा तयार केला होता त्या मसुद्याचे तात्काळ कायदयात रूपांतर करावे. मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे त्वरित मागे घ्यावे.
शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी त्याचबरोबर या समितीला मुक्तपणे काम करण्याचे अधिकार देण्यात यावे. मागासवर्ग आयोगाला मुदतवाढ देऊन मराठा समाजाचे फेर सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावे या मराठा समाजाच्या मागण्यां संदर्भात आपण आपली भूमिका विधान भवनात स्पष्ट करावी.
या सर्व मागण्यांच्या संदर्भात २० फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात लोकप्रतिनिधीनी आक्रमकपणे मराठा समाजाच्या बाजूने भूमिका मांडावी असे न केल्यास मराठा समाजाच्या प्रश्नी उदासीन आहात असे समजण्यात येईल.व येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज आपल्या बाबतीत योग्य ती भूमिका घेईल याची देखील नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी व कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने मराठा समाजाने केलेल्या मतदानाला स्मरून मराठा समाजाच्या पाठीशी उभे रहावे कारण महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे मतदान हे निर्णायक असते म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जिंकून पुन्हा आमदार व्हायचे असेल तर मराठा समाजासाठी तुम्हाला आता आवाज उठवावच लागेल अन्यथा पुढील निवडणुकांमध्ये मराठा समाज देखील जे आमदार मराठा समाजाशी गद्दारी करतील त्या आमदारांना घरी बसविण्यासाठी प्रयत्नशील असेल.
मराठा समाज त्यांच्या हक्काच आरक्षण मागतोय त्यामुळे कुठल्याही आमदारांनी वेगवेगळ्या भूमिका घ्यायचे काम करू नये ५०% च्या आत संविधानिक पद्धतीनेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडावी,कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षणाची मागणी जी केली जात आहे ती फसवी आहे.मराठा समाजाला 50% च्या आतच कायदेशीररित्या आरक्षण मिळू शकते आणि तीच मागणी सर्व आमदारांनी करावी यासाठी आमदार राहुल ढिकले यांच्यापासून आज आम्ही सुरुवात केलेली आहे.बाकीच्या आमदारांनीही यातून बोध घेऊन मराठा समाजाच्या बाबत आता विधानभवनात आपली भूमिका स्पष्ट करावी जे आमदार मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करतील त्यांचे २० तारखे नंतर समाजाच्या वतीने स्वागत केल्या जाईल जे आमदार मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेणार नाही त्या आमदारांचा निषेध म्हणून त्यांच्या विरोधात येणाऱ्या निवडणुकीत मतदानातून रोष व्यक्त केल्या जाईल याची सर्व आमदारांनी नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला.
कोट
“मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण करत असताना अजुन एकही आमदार,खासदार,मंत्री त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत नाही म्हणून आज आमदारांना जाग करण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या संदर्भात २० तारखेला होणाऱ्या अधिवेशनात समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे. जे आमदार मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहणार नाही त्यांना येणाऱ्या निवडणुकीत समाज नक्कीच धडा शिकवेल त्यामुळे आमदारांनी आता समाजासाठी विधान भवनात आवाज उठवावा कारण मराठा समाज त्यांच्यावर आता लक्ष ठेवून आहे याचीही नोंद घ्यावी.”
-करण गायकर
राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा
कोट –
“आज सकल मराठा समाजाच्या वतीने मला निवेदन मिळाले त्याची दखल घेत मी जबाबदारी घेतो की नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांना मराठा आरक्षण प्रश्नावर २० तारखेच्या विशेष अधिवेशनात आक्रमक भूमिका मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी मी त्यांना प्रवृत्त करेल मराठा समाजाच्या वतीने आज मला जे पत्र दिलं आहे ते माझ्या ऑफिसमधून माझ्या पत्रावर सर्व नाशिक जिल्ह्यातील आमदारांना तात्काळ पाठवून आम्ही आमची सर्वांची भूमिका ही नक्कीच त्या ठिकाणी एक मताने मांडून मराठा समाजाला त्यांच्या हक्काचा आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.”
– राहुल ढिकले
आमदार
नाशिक पूर्व
या आंदोलनाला नानासाहेब बच्छाव,करण गायकर,चंद्रकांत बनकर,आशिष हिरे,संजय फडोळ,योगेश नाटकर,विजय वाहुळे,सुभाष गायकर,विलास जाधव,सचिन पवार,भारत पिंगळे, शरद तुंगार,वैभव दळवी,संदीप खूठे राम निकम,राहुल शेटे,विक्रांत देशमुख,विकी गायधनी,प्रफुल वाघ,शरद लबडे,विकी काळे,रामभाऊ जाधव,शुभम महाले,संदीप फडोळ,हर्षल पवार,हार्दिक निगळ,मनोरमा पाटील,संगीता सूर्यवंशी,रोहिणी उखाडे,रेखा पाटील,सविता वाघ,रूपाली काकडे,दिपाली लोखंडे,स्वाती कदम,योगिता पाटील,संदीप हांडगे,संदीप बरे,राजेंद्र शेळके,बंटी देशमुख,हर्षल खैरनार,उदय घाडगे सागर फडोळ,कार्तिक पाटील,सुरज फडोळ,समाधान सानप. समीर वडजे,रमेश खापरे,विजय पेल महाले,मंगेश गोडसे,अनिल आहेर,सुरेश सोळंके सचिन शिंदे,प्रल्हाद जाधव, सुभाष भोसले,प्रशांत मोराडे,आधी सहज समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.