क्राईम

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकीत ४२१ जणांचे रक्तदान


आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकीत ४२१ जणांचे रक्तदान

 

संगमनेर प्रतिनिधी

 

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण अर्थकारणाला गती मिळवून देणारे माजी महसुलमंत्री व अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 421 विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त रक्तदन केले.

 

या उद्घाटन प्रसंगी विश्वस्त शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Advertisement

 

राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याव्दारे अपघातग्रस्त, आजारी व्यक्ती तसेच थायलेसेमीयाग्रस्त व्यक्तींना जीवदान मिळते. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, विभाग प्रमुख, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून ४२१ जणांनी उत्स्फुर्त रकतदान केले.

 

या शिबीरासाठी नाशिकचे डॉ. शिवाजी लहाडे, जनसंपर्क अधिकारी मंगेश राठोड तसेच अर्पण रक्तपेढी, संगमनेरचे सर्व संघ उपस्थित होते. याबरोबरच या आठवड्यात महाविद्यालयातील सर्व मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी शिबीरही आयोजित करण्यात आले होते. सध्याच्या काळातील विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या सदृढ आरोग्यासाठी हिमोग्लोबीन तपासणी व त्याविषयक सल्ला व वसतीगृहात त्यानुसार आहाराची व्यवस्था यांचे नियोजन करण्यात आले.

 

  1. कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रखमाजी गव्हाणे, डॉ. मनोज वाकचौरे, प्रा. राहुल पवार आणि सर्व समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *