क्राईम

बारामती अग्रोवर सुडबुद्धीने कारवाई; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांचा आरोप 


बारामती अग्रोवर सुडबुद्धीने कारवाई;

 

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांचा आरोप 

Advertisement

इडीने बारामती अग्रो कंपनीच्या कन्नड साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई पुर्णतः बेकायदेशीर आणि एकतर्फी आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या थकित कर्जाच्या वसुलीसाठी २०१९ साली जप्तीची कारवाई केली त्यामध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आपलं राजकीय वजन वापरून कोट्यावधींची मालमत्ता असलेले कारखाने कवडीमोल भावाने खरेदी केले.त्यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. समाज सेवक आण्णा हजारे, समाज सेवक, मेघा पाटकर, खा. राजु शेट्टी, माणिक जाधव यांनी याचिकेद्वारे महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री प्रक्रियेला आव्हान देत लिलाव प्रकिया थांबविल्या होत्या.या सर्व बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करून अहवाल सादर झाले.त्या अनुषंगाने काही कारखान्यांची विक्री व्यवहारांची चौकशी करून कारवाईची शिफारस करुन योग्य कारवाईची गरज असताना पुढे काहीही झालेले नाही.मुंबई पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाने प्रथम खबर अहवालात (F IR) गुन्हा दाखल केलाआहे. या सर्व खरेदी व्यवहारां मध्ये अनेक हेवी वेट राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय वजन वापरून कोट्यावधींची मालमत्ता कवडीमोल भावाने खरेदी केलेल्या कारखान्यांचा समावेश आहे,त्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सांगली, अर्जुन खोतकर यांच्या जालना जिल्हा सहकारी साखर कारखाना, अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद व प्राजक्ता तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी या कारखान्याच्या कथित व्यवहारांची चौकशी इडीने केली. परंतु जप्तीची कारवाई का केली नाही.हा प्रश्न महाराष्ट्रातील आम जनतेला भेडसावत आहे. विशेष बाब म्हणजे त्यावेळी मुंबई पोलीस गुन्हा अन्वेषण विभागाने दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मध्ये आ. रोहित पवार यांच्या बारामती अग्रो कंपनीचा समावेश करण्यात आलेला नव्हता, ज्यांच्यावर कार्यवाही व्हायला हवी होती,ते सहीसलामत आहेत,मात्र बारामती अग्रोवर इडीने आकसबुद्धीने व सुडबुद्धीने प्रेरीत होऊन जप्तीची कारवाई केली आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करत असतांना पुरेसे सबळ कारणेही दिले नाहीत.खरेदी व्यवहारात कोणत्या अटी आणि शर्तीचा भंग केला. हे निदर्शनास आणून दिले नसताना केवळ राजकीय सुडबुद्धिचा वापर करून एखाद्याचं राजकीय करीअर संपवणं कितपत योग्य आहे? तत्कालीन एफ आय आरमध्ये जे लोक आरोपी करण्यात आलेले आहेत,त्या सर्वांविरूद्ध कारवाई झालेली नाही. केवळ सुडबुद्धीने रोहित पवार यांच्या बारामती अग्रो वरच कशी कारवाई केली ? बारामती अग्रोने शिखर बँकने निश्चित करण्यात आलेल्या मुल्यांकनापेक्षा कमी दरात कारखान्यांची मालमत्ता खरेदी केलेली नाही.शिखर बँकेच्या निर्देशानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली असताना विशिष्ट हेतूने प्रेरित होउन आमदार रोहित पवार यांच्या बारामती अग्रोवर जप्तीची कारवाई होता असताना त्यांचे चुलत भाऊ असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालकीच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सांगली, नंदुरबारचा पुष्पंदंतेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत वेगळा न्याय का ? जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पशा थकित कर्जाच्या वसुलीसाठी जप्त करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवारांनी माय पॉवरचा गैरवापर करून अनेक सहकारी साखर कारखाने ताब्यात घेतले. तेव्हा त्यांचे सर्व व्यवहार हे पारदर्शक होते का? रोहित पवार यांच्या मालमत्तेची चौकशी करत असतांनाच अजित पवार यांच्याही सर्व मालमत्तेची चौकशी करून दुध का दुध पाणी का पाणी केले असते तर पुरोगामी महाराष्ट्रातील आम जनतेने स्वागतच केले असते.इडीच्या प्रोव्हिजनल जप्तीची कारवाई होत असतांना इडीने अधिकृतपणे कायद्याच्या चौकटीतून जाहीर आरोपाद्धारे नैसर्गिक न्याय तत्वांचा अवलंब करून कारवाई केली असती तर त्याचे स्वागतच केले असते.ऐन हंगामात कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे हजारो उस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.तसेच हजारो उस तोडणी कामगार व कारखान्यात रात्रंदिवस काम करणाऱ्या शेकडो कामगारांची रोजीरोटी बंद करून काय साध्य होणार आहे? बारामती अग्रोचे सर्वेसर्वा आ. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांना आव्हान करतांना सांगितले आहे की या सर्व बेकायदेशीर जप्ती प्रक्रियेची सत्यता पडताळून पाहावी.

 

– कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *