डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन
सिन्नर प्रतिनिधी :- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.
येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची जास्तीत जास्त टक्केवारी वाढणे यासाठी निवडणूक आयोगाकडे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावातून घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी काढली. विद्यार्थ्यांच्या हातात मतदान विषयक घोषणा देणारे फलक दिसून आले.मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो,मतदानासाठी वेळ काढा-आपली जबाबदारी पार पाडा, चला मतदान करू या- लोकशाही रुजवू या घोषनांनी गाव व परिसर दुमदुमाला. ठिकठिकाणी गावातील ज्येष्ठ नागरिक ,तरुण, महिला व नवमतदार यांना जनजागृती फेरीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या अगोदर विद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आव्हान यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक रामदास वाजे यांनी केले.
विद्यालयाचे प्राचार्य दिंगबर पठारे,पर्यवेक्षक रामदास वाजे, शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर. करपे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य दिगंबर पठारे पर्यवेक्षक रामदास वाजे,पी.आर.करपे, केंद्रस्तरीय मतदान नोंदणी अधिकारी सोमनाथ गिरी डोंगरसिंग रबडे, शिवाजी गुरूळे ,पोलीस पाटील प्राध्यापक रामदास वारुंगसे, शिवनाथ हुजरे,कांगणे सुनील ससाने ,सुषमा थोरात,सिद्धी आहेर आदींश शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.