वैज्ञानिक व्हायचं असेल तर प्रथम विद्यार्थी व्हा:ओमप्रकाश कुलकर्णी
वैज्ञानिक व्हायचं असेल तर प्रथम विद्यार्थी व्हा:ओमप्रकाश कुलकर्णी
नाईक फार्मसी कॉलेजमध्ये गप्पा वैज्ञानिकांशी कार्यक्रम संपन्न
नाशिक प्रतिनिधी:
आपण आयुष्यभर विद्यार्थी असले पाहिजे. लर्निंग हे आपल्या आयुष्यात कधीच कमी झालं नाही पाहिजे मी अजून स्वतः विद्यार्थी आहे असं त्यांनी आवर्जून सांगत चौकटिबध्द शिक्षणातून बाहेर आले पाहिजे.वैज्ञानिक बनण्यासाठी प्रथम विद्यार्थी बनणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना चौकटी बाहेर शिक्षण देऊन सक्षम करण्याच्या टिप्स अवकाश वैज्ञानिक ओमप्रकाश कुलकर्णी यांनी दिल्या.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था,नासिक एज्युकेशन सोसायटी सायन्स फोरम, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या प्रांगणात फार्मसी महाविद्यालयात गप्पा वैज्ञानिकांशी टॉक शो कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि.९) करण्यात आले होते. यावेळी वैज्ञानिक ओमप्रकाश कुलकर्णी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,नाएसोचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके,के व्ही एन नाईक कला वाणिज्य व सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सानप,नाईक फार्मसी महाविद्यालयाचे डॉ. अविनाश दरेकर,लोकनेते गोपीनाथ मुंडे इंजीनियरिंग कॉलेजचे डॉ. कैलास चंद्रात्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एडवोकेट लीना ठाकूर यांनी लीना ठाकूर यांनी आय.पी ऑटोर्णी व रवींद्र भारुडे यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट कौशल्य क्षमता आहे हे ओळखून त्यामध्येच अचीवमेंट केले पाहिजे असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ओमप्रकाश कुलकर्णी सरांनी अतिशय चपखलपणे उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे प्रश्नांचे समाधानही केले. विज्ञान वारकरीचे रवींद्र शास्त्री यांनी मुलाखत घेतली. सायन्स फोरमचे डॉ. प्रवीण जोशी,प्रकाश लांडगे,डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांनी विशेष संयोजन केले. सूत्रसंचालन नाईक कॉलेज डिजिटल मीडियाच्या प्रा. श्वेता खोडे व त्यांच्या विद्यार्थिनी यांनी केले तर आभार इन्स्पायर मानक जिल्हा समन्वयक विनीत चोरडिया यांनी मानले.
*चौकट*👇
*”गप्पा वैज्ञानिकां”शी २ रे पुष्प दि. १६ मार्च रोजी:*
आपल्या नाशिकमधील बाल वैज्ञानिकांच्या विचारांना दिशा मिळण्यासाठी, थोर वैज्ञानिकांना ऐकता यावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा, त्यांच्या प्रश्न तथा शंकांचे समाधान व्हावे, थोर वैज्ञानिक व्यक्तींचा जीवन प्रवास समजून घेत ते करीत असलेल्या क्षेत्रातील मौलिक माहिती,प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून “गप्पा वैज्ञानिकां”शी या उपक्रमांतर्गत वीस थोर वैज्ञानिकांची हितगुज साधले जाणार असून त्यातील व्ही एन्.नाईक फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम पुष्प संपन्न झाले.
— बाळासाहेब दादा सोनवणे,
जिल्हा समन्वयक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन