पाथरे हायस्कूल येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी
पाथरे हायस्कूल येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी
सिन्नर (प्रतिनिधि)-
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित शिक्षणमहर्षी स्व. नानासाहेब गडाख संकुलाच्या पाथरे हायस्कूल पाथरे येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष दौलतराव मोगल ज्येष्ठ संचालक विजय आप्पा गडाख संस्थेचे सी ई ओ अभिषेक गडाख यांच्या मार्गदर्शनातून झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती माता, नानासाहेब गडाख व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जेष्ठ शिक्षक संजय शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पर्यवेक्षक सुनिल पगार, बाबासाहेब डुंबरे, मिनानाथ जाधव, सिताराम रानडे, रमेश गडाख,राजू कांबळे, संजय साळवे, प्रशांत दातरंगे, छाया शेळके आदी उपस्थित होते.
विद्यार्थी व शिक्षकांनी टिळकांच्या जीवन कार्याविषयी भाषणे केली.भाषणामध्ये सहभागी पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
रितिका नरवडे व श्वेता वाणी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.