लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटिचा शुक्रवारी पदग्रहण सोहळा.
लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटिचा शुक्रवारी पदग्रहण सोहळा.
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर.. येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीच्या लाईनस्टिक इयर 2924-25 साठी नूतन अध्यक्ष नितीन पटेल,सेक्रेटरी स्वप्नील धूत,खजिनदार किशोर लहामगे व पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा माजी प्रांतपाल MJF राज मूछाल तसेच नवीन सभासदांचा दीक्षा प्रदान सोहळा माजी प्रांतपाल राजेश कोठावदे यांच्या हस्ते होणार आहे.समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल गिरीष भाई मालपाणी, रिजन चेअर पर्सन राजू भाई व्यास उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. नुकतेच गोदावरी स्वच्छ्ता अभियाना साठी अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर असलेले सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या कडेअभियानासाठी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.पद्मश्री पुरस्कार ने गौरविलेले मुंबई येथील प्रसिध्द नेत्रपटल शस्त्रक्रीया तज्ज्ञ डॉ एस नटराजन यांनी रुग्णांची तपासणी केली व त्यातील लाभार्थ्यांची मुंबई येथे डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.पूरग्रस्तांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करणे अशा विविध समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या क्लबच्या नूतन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवार दि.२६ जुलै सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल पंचवटी, रॉयल बेंक्वेट हॉल, सिन्नर येथे होणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी चे मावळत्या अध्यक्षा ज्योती निऱ्हाळी, सेक्रेटरी सविता देशमुख,खजिनदार अश्विनी धुत,कांती पटेल, महेंद्र तारगे,डॉ प्राणेश सानप,सर्जेराव देशमुख,महावीर खीवंसरा, राहुल चोथवे,करण कटारिया, विकास महाजन, सुनील चकोर,दया पटेल, वैशाली तारगे,भारती लहामगे, नंदु निऱ्हाळी यांनी केले आहे.