विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे शिक्षक हे खऱ्या अर्थाने गुरू विजय गडाख
विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे शिक्षक हे खऱ्या अर्थाने गुरू
विजय गडाख
सिन्नर (प्रतिनिधि)
शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवत असतात. त्यांचा चांगल्या वाईटाची जाण करून देत असतात. तेच विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत असतात म्हणून शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु आहेत, असे प्रतिपादन माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक विजय गडाख यांनी केले.
संस्थेच्या शिक्षणमहर्षी स्व.सूर्यभानजी गडाख शैक्षणिक संकुलातील पाथरे हायस्कूल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर प्राचार्य एस.आर.जहागीरदार,पर्यवेक्षक सुनील पगार,संजय शेलार,बाळासाहेब खुळे,बाबासाहेब डुंबरे, छाया शेळके, राजू कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथमतः सरस्वती व नानासाहेब गडाख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय साळवे,सुवर्णा मोगल,नवनाथ हासळे,नवनाथ कांबळे, मिननाथ जाधव,रमेश गडाख,सिताराम रानडे, प्रशांत दातरंगे, तुषार खेडकर, प्रतिमा कोकाटे, श्रीमती सोनवणे,विठ्ठल पानपाटील आदिंनी परिश्रम घेतले.