*गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा*
*गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा*
सिन्नर प्रतिनिधी
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचालित एस जीं पब्लिक स्कुल च्या प्रांगणात गुरुपौर्णिमा एका अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. स्व.नानासाहेब गडाख यांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करून, तसेच विद्यादायीनी सरस्वती मातेस वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी विद्यालयातील ई १० वी च्या विद्यार्थिनींनी गुरुप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी सर्व शिक्षकांवर पुष्पवर्षाव करत त्यांना व्यासपीठावर निमंत्रित करून यथोचित सत्कार करण्यात आला,याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री सलीम चौधरी सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरुपदेश केला,विद्यालयातील विद्यार्थिनी कु गौरी पोटे व प्रसाद आवारे यांनी गुरुप्रती ऋण व्यक्त करत आपली मनोगते व्यक्त केली, तसेच कु.कार्तिकी कोटकर व रितू कहांडळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ई १० वी चे वर्गाशिक्षक श्री.गुंजाळ,सोमवंशी,सोनवणे यांनी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री.मोगल,सातपुते, गाडेकर, माळी, सुडके,तिडके,श्रीमती वाघ,श्रीमती उशीर,श्रीमती देवकर,श्रीमती देशमुख,श्रीमती चिने,श्रीमती तुपे,श्रीमती पाबळे, श्री,सोनवणे, बस्ते,महाले,धूम,पी एस कांबळे,रत्नाकर गडाख, गणेश श्रीमंत, सतीश गायकवाड, बाळू गडाख,कृष्णा कर्पे, शरद शिरोळे, प्रा.रामसे,प्रा.पारखे, प्रा.उगले यांनी मार्गदर्शन केले